- Advertisement -

ऑस्ट्रोलीयाविरूद्ध एकदिवशीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद तर ‘हा’ तेज गोलंदाज संघात दाखल, रोहित शर्मा पहिला सामना मुकणार..

0 0

ऑस्ट्रोलीयाविरूद्ध एकदिवशीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद तर ‘हा’ तेज गोलंदाज संघात दाखल, रोहित शर्माला बाहेर बसवले गेले…


आज म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी भारतीय क्रिकेट संघाने (टीम इंडिया) दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने देखील संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 3 मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

रोहित शर्मा या मोठ्या कारणामुळे झाला संघा बाहेर..

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात उपलब्ध होणार नाही. अशा परिस्थितीत या मालिकेत उपकर्णधारपदी नियुक्त झालेला हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहितला वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्थान मिळालेले नाही. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत शतक झळकावल्यामुळे टीम इंडियासाठीही हा मोठा धक्का असू शकतो.

जयदेव उनाडकटला संधी मिळाली.

हार्दिक पंड्या

यासोबतच, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या वतीने एकदिवसीय संघात मोठा बदल करत ३१ वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संघात स्थान देण्यात आले आहे. 2013 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता, म्हणजेच 10 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध. अलीकडेच, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामात सौराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिले. ज्याच्या अंतिम सामन्यात त्याने 9 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, उनाडकटने 7 सामन्यात 4 च्या इकॉनॉमीसह 8 बळी घेतले आहेत.

IND vs AUS: एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट


हेही वाचा:

हा बस कंडकटर बसमध्ये चढलेल्या प्रत्येक माणसाला आधी पाणी पाजतो, गेल्या 12 वर्षापासून करतोय अखंड सेवा, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक..

18 चौकार, 2कडक षटकार… टीम इंडियात मिळत नाही संधी म्हणून, अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये दाखवली आपली ताकत. गोलंदाजांना फोडून काढत शतक ठोकलेच शिवाय नावावर केले हे मोठे विक्रम..

Leave A Reply

Your email address will not be published.