चोकर्सचा टॅग लागलेल्या ‘या’ संघानेच वनडे क्रिकेटमध्ये केल्यात 4 वेळा 400 पेक्षा अधिक धावा.

0

हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं लेकिन क्रिकेट वर्ल्ड कप में जीतकर हार जाने वाले को ‘चोकर्स’ कहते हैं। आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिका संघाविषयी, जो संघ वर्ल्डकप सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये चांगली कामगिरी करूनही मोक्याच्या क्षणी कमी पडतो. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या संघाला विश्वचषक जिंकण्याच्या अनेक संधी आल्या तरीही एकदाही विश्वचषक जिंकू शकला नाही. यामुळेच या संघाच्या नावापुढे चोकर्सचा टॅग लागला आहे.

विश्वचषक स्पर्धेत या 8 खेळाडूंनी ठोकल्या होत्या एकाचं षटकात सर्वाधिक धावा; यादीत आफ्रिकी खेळाडू सर्वाधिक.

वनडे विश्वचषक स्पर्धेमधील साखळी सामन्यात हा संघ दमदार कामगिरी करत असला तरी सेमी फायनलच्या पुढे कधीच जाता आले नाही. एकेकाळी वनडे क्रिकेटमध्ये तीनशे धावांचे आव्हान हे मोठे समजले जात होते. मात्र, अलीकडील काळामध्ये 400 धावांचा टप्पा सहज ओलांडला जातोय. याच दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे वर्ल्डकप मध्ये एक दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे.  विशेष म्हणजे याच वर्षी या संघाने दोनदा 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे.

विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना तिसऱ्यांदा 429 धावा केल्या होत्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. वनडे वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा त्यांनी 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे 

2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना 418 एवढ्या डोंगराएवढा धावा केल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानेच विश्वचषकावर पाचव्यादा कब्जा केला होता.

वेस्टइंडीज मध्ये 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने बरमूडा संघाविरुद्ध खेळताना 414 इतके मोठे आव्हान ठेवले होते. भारतासारख्या बलाढ्य संघापुढे बरमूडासारख्या दुबळ्या संघाची डाळ शिजली नाही. वन डे वर्ल्डकप मध्ये चारशे धावांचा टप्पा उलटणारा भारतीय संघ हा जगातला पहिला संघ ठरला.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हिटमॅन करू शकतो एबी डिव्हिलियर्सचा विक्रम उध्वस्त

2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत साऊथ आफ्रिकेने आयर्लंड विरुद्ध खेळताना 412 धावा काढल्या होत्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी ठरला होता.

2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेत खेळताना दुसऱ्यांदा 400 पेक्षा अधिक धावा काढल्या होत्या. वेस्टइंडीज विरुद्ध खेळताना 409 धावा काढत सामना सहज जिंकला.

शनिवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंड विरुद्ध खेळताना चारशे धावा केल्या होत्या. वनडे वर्ल्डकप मध्ये 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडण्याची ही त्यांची चौथी वेळ होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 229 धावांनी दणदणीत पराभव केला.


हेही वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.