Cricket News

World cup 2023 नंतर पाकिस्तान कर्णधार बाबर आझमची होणार कर्णधारपदावरून हकालपट्टी, पाकिस्तानी मिडीयाने केला मोठा खुलासा..

World cup 2023 : विश्वचषक 2023 (ICC ODI WORLD CUP 2023) मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी काही विशेष राहिली नाही ज्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर बरीच टीका होत आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की बाबर अझाकने कर्णधारपद सोडल्याच्या बातम्या येत आहेत. होय, विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर आता अशा बातम्या समोर आल्या आहेत ज्याच्या आधारे बाबर आझम पाकिस्तानी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होऊ शकतो, असे मानले जात आहे.

असे झाले असते तर बाबर आजम देखील विराट कोहली बरोबर भारतीय संघात खेळला असता...!

खरेतर, पाकिस्तानी चॅनल जिओ सुपरच्या एका अहवालात असे समोर आले आहे की, बाबर भारतातील विश्वचषक स्पर्धेनंतर ODI आणि T20 फॉरमॅटमधील नेतृत्वाच्या भूमिकेतून राजीनामा देऊ शकतो कारण तो पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आणि त्याच्या जवळच्या लोकांकडून मार्गदर्शन घेत आहे. तसेच बाबर आझम इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ईडन गार्डन्सवर रमीझ राजासोबत दीर्घ चर्चा करताना दिसला होता.

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानने पहिल्या 8 पैकी फक्त 4 मॅच जिंकल्या आहेत. ती सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून ती बाहेर आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे माजी खेळाडूही बाबर आझमच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही पाकिस्तानला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही, हे विशेष.

बाबर आझमच्या विश्वचषक २०२३ मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याची आकडेवारीही फारशी प्रभावी नाही. या मोठ्या स्पर्धेत बाबरच्या बॅटमधून केवळ 282 धावा झाल्या आहेत. येथे त्याचा स्ट्राईक रेट 82.69 आहे, ज्यामुळे त्याच्या संथ खेळीमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत बाबर आपल्या भविष्यासाठी काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button