अवघ्या काही महिन्यांत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे, ज्यासाठी असे अनेक संघ आहेत जे मजबूत स्थितीत दिसत आहेत. या तिघांच्या बाबतीत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे त्यात आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारताला थोडी अधिक मेहनत करावी लागणार आहे. टीम इंडियाकडे अजून बराच वेळ आहे. पुढील सामन्यांपैकी काही सामने जिंकले तर ते शक्य होऊ शकते.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या ४ संघाची नावे सांगणार आहोत जे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाऊ शकतात. पाकिस्तान इंग्लंडकडून कसोटी समाना हरल्यानंतर त्याचे आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. मात्र हे 4 देश आपापला संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यात घेऊन जाऊ शकतात..
View this post on Instagram
ऑस्ट्रेलिया : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या मजबूत स्थितीत आहे. आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळताना ऑस्ट्रेलियाने 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आता पूर्णपणे स्पष्ट झाली आहे.
दक्षिण आफ्रिका: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ असेल तर तो दुसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिका आहे. सध्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघही मजबूत स्थितीत दिसत आहे. फरक एवढाच की दक्षिण आफ्रिकेला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. यानंतर त्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल.
View this post on Instagram
श्रीलंका: श्रीलंकाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा दावेदार आहे. हा संघ सध्या कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. पण विशेष म्हणजे टक्केवारीत तो बाकीच्या संघापेक्षा पुढे आहे. श्रीलंकेच्या संघाने आपली शानदार कामगिरी अशीच सुरू ठेवली तर त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
View this post on Instagram
भारत: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताला कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून विजेतेपद मिळवण्याची मोठी संधी आहे. जरी भारताने आपले सर्व सामने जिंकले तरी भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळू शकतो. इंग्लंडकडून पाकिस्तानच्या पराभवाचा भारताला खूप फायदा झाला आहे. म्हणूनच पुढील काही सामने जिंकून भारत सुद्धा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप च्या अंतिम सामने खेळू शकतो.

महत्वाचे म्हणजे भारतीय संघाला आता पुढील कसोटी सामने जे जवळपास भारतातच खेळायचे आहेत आणि घरच्या मैदानावर भारतीय संघाचा रेकोर्ड खूप चांगला. आहे मागच्या 10 वर्षात भारत अत्यंत कमी कसोटी सिरीज घरच्या मैदानात हरला आहे. म्हणूनच हे एक संघासाठी मोठा फायदा होऊ शकतो.
हेही वाचा: