झेल घेतांना जखमी झाला, बोटातून रक्त येत असतांना सुद्धा मिचेल स्टार्कने केली कसोटीत गोलंदाजी, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल….
झेल घेतांना जखमी झाला, बोटातून रक्त येत असतांना सुद्धा मिचेल स्टार्कने केली कसोटीत गोलंदाजी, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तुफान व्हायरल….
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान मिचेल स्टार्कला दुखापत झाली. त्याच्या बोटातून रक्तस्त्राव सुरू झाला, तरीही त्याने गोलंदाजी केली. त्याच्या बोटातले रक्त त्याच्या कपड्याला लागले होते. पहिल्याच दिवशी झेल घेताना मिचेल स्टार्कला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने गोलंदाजी केली. त्याचे धाडस पाहून लोक त्याला खरा हिरो म्हणू लागले आहेत. या सामन्यातील व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्याचे खेळाप्रतीचे प्रेम पाहता लोक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
या दुखापतीमुळे मिचेल स्टार्कच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) ४ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत खेळण्याच्या आशा मावळल्या आहेत. पण दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी करताना पाहून आता सर्व काही ठीक आहे असे वाटते. स्टार्कने दुसऱ्या डावात 4 षटके टाकली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावून 15 धावा केल्या आहेत.
Mitch Starc is bowling through the pain 😳 #AUSvSA pic.twitter.com/oVaRbZmfDU
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2022
दुखापतीनंतर स्टार्कला स्कॅनसाठी नेण्यात आले. त्यानंतर पट्टी बांधून तो मैदानावर परतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी करून स्टार्क हा सामना खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे. तो पुढे म्हणाला की सामना संपल्यानंतर त्याच्या प्रकृतीचे पुन्हा मूल्यांकन केले जाईल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 189 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये वॉरनने 52 आणि मार्को जॅनसेनने 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 575 धावा करून डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 200, स्टीव्ह स्मिथने 85, अॅलेक्स कॅरीने 111, हेडने 51 आणि ग्रीनने 51 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना नॉर्खियाने ३, रबाडाने २ बळी घेतले.

या सामन्यात मात्र सगळीकडे स्टार्कच्या खेळभावनेचे कौतुक होतांना दिसले आहे.
पहा व्हिडीओ:
Cricket Australia initially indicated no dislocation for Mitchell Starc, if true the main concern here is mallet finger (tendon tear on top of the finger). One of the more common causes of the tip of the finger bending like that. Hope that’s not the casepic.twitter.com/V6a8WDKCO9
— NRL PHYSIO (@nrlphysio) December 26, 2022