नॉकआउट सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने घडवला इतिहास, बांग्लादेशच्या 4 तगड्या फलंदाजांना बाद करत नावावर केले मोठे विक्रम..!
टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 12 फेरीतील शेवटच्या दिवशी पाकिस्तानची सेमी फायनल गाठण्याची शक्यता चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 127 धावात रोखले. जर पाकिस्तानने हे आव्हान पार केले तर ते भारतासोबत सेमी फायनलसाठी पात्र होतील. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने मोक्याच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावत बांगलादेशचे 4 बळी टिपले. तर बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतोने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली नाही.
View this post on Instagram
या सामन्याच्या पहिल्या डावात हिरो ठरला तो म्हणजे पाकिस्तानचा तेज गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी.. आफ्रिदीने गोलंदाजी करतांना मोक्याच्या क्षणी बांग्लादेशच्या महत्वाच्या ४ खेळाडूंना बाद करत माघारी पाठवले, ज्यामुळे बांगलदेश केवळ १२७ धावाच काढू शकला. आणि पाकिस्तान समोर विजयासाठी १२८ धावांचे माफक लक्षठेवण्यात आले.
पाकिस्तानी संघाचे सलामीवीर दोघेही चांगल्या फोर्ममध्ये खेळत असून बाबर आझमने २७ आणि मोहमद रिजवान ३२ धावा काढून खेळत आहेत. याच पद्धतीने खेळ सुरु राहिल्यास पाकिस्तानला सामना सहज जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर दुसरीकडे बांगलदेशला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी लवकरात लवकर विकेट घेणे जरुरी होऊन बसले आहे..

शाहीन आफ्रिदीच्या नावावर झाले मोठे विक्रम..
४ गडी बाद केल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नावावर मोठे विक्रम झाले आहेत. वर्ल्डकपच्या नॉकआउट सामन्यात ४ गडी बाद करणारा शाहीन आफ्रिदी एकमेव गोलंदाज बनला आहे. आजपर्यंत दोन्ही संघाला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असलेल्या सामन्यात कोणीही असा विक्रम केला नव्हता..
शाहीनच्या या प्रदर्शनाने पाकिस्तानी चाहते त्याच्यावर खूपच खुश झाले असून सोशल मिडीयावर त्याचे कौतुक केलं जातंय. आफ्रिदीसोबतच शाहबाद खानने दोन तर इतिखर अहमदने एक गडी बाद करत बांगलदेशच्या संघाला कमी धावसंखेत रोखण्यात मदत केली..
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..