वनडे विश्वचषक 2023 मध्ये सुमार कामगिरी केल्यामुळे पाकिस्तान संघावर चौकार टीकेचा भडीमार होत आहे. प्रत्येक जण त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. याच दरम्यान माजी कर्णधार रशीद लतीफ याने काही गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितले की पाकिस्तानच्या खेळाडूला मागील पाच महिन्यापासून पगार दिला गेला नाही यासोबतच पीसीबी चे अध्यक्ष जका अश्रफ हे संघाचे कर्णधार बाबर आजम यांचा फोन उचलत नाहीत. पाकिस्तान मधील एका वृत्तसंस्थेशी बोलताना रशीद लतिफ याने या गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे.
रशीद लतीफ म्हणाले, “मला माहिती आहे की बाबरने भारतातून फोन केला आणि मेसेज केला तेव्हा त्याला चेअरमन (जका अश्रफ) कडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. खेळाडूंना त्यांचे वेतन मिळालेले नाही. अध्यक्षांनी कर्णधाराच्या फोनला उत्तर दिले नाही. फोन रिसिव्हच करत नाही आणि या परिस्थितीत आम्ही संघाकडून काय अपेक्षा कराव्या. ”
बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी ज्या केंद्रीय करारांवर स्वाक्षरी केली होती, त्याचे आता पुनरावलोकन केले जात असल्याची माहिती बोर्डाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली असल्याचा दावाही लतीफने केला. तथापि, त्याने आपल्या दाव्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत.
पाकिस्तान संघ अजूनही ऑफिशिअली सेमी फायनल च्या रेस मधून बाहेर नाही परंतु टॉप चार मध्ये पोहोचणे हे जवळपास असंभव आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला सहा सामने जिंकावी लागणार आहेत. पण पाकिस्तानी सहापैकी केवळ दोनच सामन्यात विजय मिळवला आहे तर सलग चार सामन्यात पराभव झाला आहे. पाकिस्तानात सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना प्रत्येक सामना हा मोठ्या अंतराने जिंकावा लागेल तसेच इतर संघाच्या पराभवासाठी प्रार्थना देखील करावी लागेल. पाकिस्तानने जर दहा गुण मिळवले तर सेमी फायनल मध्ये तो संघ कसा-बसा पोहोचू शकतो.
पाकिस्तानचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणांमध्ये सुमार कामगिरी केली आहे. त्याचाच फटका म्हणून त्यांना सलग चार सामन्यात पराभवातला सामोरे जावे लागले. पराभवानंतर बाबरच्या नेतृत्वावर देखील मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मैदानात उतरल्यानंतर बाबर सतत त्याच्या खेळाडूंवर चिडत असल्याचे दिसून येत होता. संघातील खेळाडू आणि कर्णधारांमध्ये कोणताच ताळमेळ दिसत नव्हता.