बांगलादेश दौऱ्यावर फक्त दर्शक बनून राहिले टीम इंडियाचे हे खेळाडू, संघातर निवड झाली मात्र एकदाही मैदानावर उतरले नाही..
बांगलादेश दौऱ्यावर फक्त दर्शक बनून राहिले टीम इंडियाचे हे खेळाडू, संघातर निवड झाली मात्र एकदाही मैदानावर उतरले नाही..
बांगलादेश आणि भारत (BAN vs IND) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळवला जाईल. हा सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना टीम इंडियाने गमावला आहे. अशा स्थितीत भारत आता आपला सन्मान वाचवण्यासाठी तिसरा सामना खेळणार आहे.
कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक द्रविड यांनी या 3 खेळाडूंचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला असता तर भारताने ही मालिका गमावली नसती, परंतु कर्णधार आणि प्रशिक्षकाने या खेळाडूंना केवळ पर्यटक म्हणून बांगलादेश दौऱ्यावर नेले होते.
View this post on Instagram
राहुल त्रिपाठी: या यादीतील पहिले नाव राहुल त्रिपाठीचे आहे, ज्याला बांगलादेश दौऱ्यावर पर्यटक म्हणून नेण्यात आले आहे. हा खेळाडू गेल्या काही मालिकांमध्ये टीम इंडियाच्या संघाचा भाग होता, परंतु आतापर्यंत त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्रिपाठीची आयपीएल 2022 पासून टीम इंडियामध्ये निवड केली जात आहे, परंतु त्यांना संधी मिळत नाहीये. 2022 च्या मोसमात त्याने 14 सामन्यात 413 धावा केल्या आहेत.
रजत पाटीदार: या यादीतील दुसरे नाव राहुल त्रिपाठीचे आहे, ज्याला बांगलादेश (BAN vs IND) दौऱ्यावर पर्यटक म्हणून नेण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारावर पाटीदारची संघात निवड झाली आहे, मात्र आजपर्यंत त्याला एकाही सामन्यात भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
राहुल त्रिपाठी प्रमाणेच रजत पाटीदारही आयपीएलमुळे प्रकाशझोतात आले होते. या खेळाडूने आयपीएलच्या 12 सामन्यांमध्ये 404 धावा केल्या आहेत. राहुल प्रमाणे यालाही अनेक दौऱ्यावर टीम इंडियात संधी मिळाली मात्र सामने खेळण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या प्लेईंग 11 मध्ये मात्र त्याची निवड होत नाही.
असच सुरु राहिले तर या दोघांचे करिअर वाट पाहण्यातच संपून जाऊ शकतो. टीम इंडियातील असे आणखी कोणते खेळाडू आहेत ज्यांना मैदानावर खेळण्याची संधी मिळायला हवी? कमेंट करून नक्की सांगा.
हेही वाचा:
ईशान किशन पाठोपाठ विराट कोहलीनेही ठोकले ताबडतोब शतक, 44 व्या शतकासाठी विराट कोहलीने मोडले हे मोठे विक्रम..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…