आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. स्पर्धेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवावर त्यांच्यावर चौफेर टीका होतेय. साधारण गोलंदाजी, सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण व फलंदाजांनी केलेले अंधा धुंद फटकेबाजी यामुळे पाकिस्तानचा संघ गोत्यात आला आहे. पाकिस्तानच्या संघाला पाच पैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळाला असून त्यांचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे रस्ते अवघड झाले आहेत.
पाकिस्तानच्या या पराभवाला कर्णधार बाबर अजमला दोषी ठरवण्यात येत आहे. पाकिस्तानचा संघ सेमी फायनल मध्ये पोहोचला नाही तर पाकिस्तानच्या संघात बराच मोठा उलटफेअर होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ मायदेशी परतल्यानंतर बाबरकडून नेतृत्व पद काढून घेण्याची शक्यता आहे. बाबर नंतर संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमद, मोहम्मद रिजवान व शाहीनशहा आफ्रिदी या तीन खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. या विश्वचषक स्पर्धेत बाबरला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठी संधी चालून आली होती, मात्र त्यांनी ती दोन्ही हाताने गमावली. पाकिस्तानच्या पराभवानंतर त्याच्यावर टीकेचे झोड उठली आहे.
बाबर देखील पाकिस्तान संघाचे नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी जास्त फारसे स्वार असे दाखवत नाही. त्याच्याकडून नेतृत्व पद काढून घेतलेले तर तो फलंदाजीवर पूर्णतः लक्ष केंद्रित करू शकतो. विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावयाचा आहे. त्यानंतर आयसीसी टी-20 2024 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. पाकिस्तानच्या कामगिरीत कोणताच बदल झाला नाही तर बाबर आजमकडून नेतृत्व काढून घेतले जाऊ शकते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबा उल हक याने तर खुलेआम बाबर वर टीका केली होती. त्याला दिलेल्या नेतृत्वाच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. मिस्बाह म्हणाला की, बाबर आजमला त्याच्या मर्जीनुसार 18 खेळाडू देण्यात आले आहेत तरी देखील त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने मी त्याला मिस्टरी फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला निवडण्यासाठी सांगितले होते. मात्र त्याने मर्जीतला खेळाडूंनाच संघात स्थान दिले.
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचे पुढील 4 सामने होणार आहेत. या 4 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला आणि सेमीफायनल मध्ये कशीबशी जागा मिळवली तर बाबरचे नेतृत्व धोक्यात येऊ शकणार नाही. असे असले तरी कसोटी आणि वन-डे क्रिकेटमध्ये बाबरला कायम ठेवण्यात येऊ शकते. मात्र T20 संघाचा स्वतंत्र कर्णधार नेमला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ नव्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली मैदानात खेळताना उतरलेला दिसेल व त्यासोबत नव्या कोचिंग स्टाफ सुद्धा असू शकतो.