भारतीय संघ वर्ल्डकप मधून बाहेर पडल्यानंतर या खेळाडूवर भडकला वीरेंद्र सेहवाग, म्हणाला” ताबडतोब संघातून बाहेर करा”
टीम इंडियाचा टी-२० वर्ल्ड कप २०२२ मधील प्रवास उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाल्याने संपला. सुपर-१२ फेरीत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली असली तरी उपांत्य फेरीत मात्र सर्वांचे लक्ष लागून असलेली जादू ही संघ दाखवू शकला नाही. या पराभवाने टीम इंडियाचा टी-२० प्रवास संपुष्टात आला असला तरी टीकेची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. टीमचा माजी ओपनिंग बॅट्समन वीरेंद्र सेहवाग भारताच्या कामगिरीवर अजिबात खूश नव्हता आणि त्याने टीममध्ये सुधारणा करण्याची महत्त्वाची सूचना दिली.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० गडी राखून झालेला पराभव विसरू शकत नाही. आता संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्याची सूचना त्यांनी केली आहे. यावेळी संघात कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाज भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी यांसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा वर्ल्ड कपसाठी वरिष्ठ खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी सातत्याने आपल्या कामगिरीने सर्वांना निराश केले आहे.

टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलताना वीरेंद्र सेहवागने क्रिकबझने म्हंटले होते- “मला संघात अकार्यक्षम वरिष्ठ खेळाडू बघायचे नाहीत.” या काळात त्याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसले तरी त्याचा संबंध संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्याशी नक्कीच जोडला जाऊ शकतो, ज्याने आपल्या कामगिरीने संघाला सातत्याने निराश केले आहे.
वीरेंद्र सेहवागने ज्या प्रकारे सीनियर खेळाडूंवर निशाणा साधला आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा संघाचा कर्णधार रोहित शर्मावर लागल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या या स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले होते. त्याशिवाय त्याला ६ सामन्यांत४ ,५३ ,१५ ,२, व ५ आणि २७ अशा केवळ ११६ धावा करता आल्या. या स्पर्धेतील कामगिरीने त्याने चाहत्यांना तसेच संघ व्यवस्थापनाला चिंतेत टाकले आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…