संघात सामील झाला तर…”, बूम-बूम जसप्रीत बुमराहला आरसीबीच्या कर्णधाराकडून ओपन ऑफर..!

0
2
संघात सामील झाला तर...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

मुंबई इंडियन्सचा अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात भलेही मिचल स्टार्क हा महागडा खेळाडू ठरला असला तरी बुमराह ऑक्शनमध्ये आला तर त्याचा हा विक्रम क्षणात चकणाचूर होऊ शकतो.

जसप्रीत बुमराहने मोडला आशिष नेहराचा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम, आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा केली अशी कामगिरी..!

आयपीएल 2024 मधील 25व्या सामन्यात बुम-बुमचा कमाल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात एका आदर्श गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने चार षटकात 21 धावा देत 5 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. या दमदार कामगिरीच्या जोरावर बुमराहला आता पर्पल कॅपच्या रेसमध्ये सर्वांच्या पुढे गेला आहे. त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे एका फ्रेंचाईजीने बुमराहला स्पेशल बंपर ऑफर दिली आहे.

आरसीबी  कर्णधाराकडून जसप्रीत बूमराहचे विशेष कौतुक..

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमरा याला बंपर ऑफर मिळाली आहे. ही फ्रेंचायजीने जसप्रीत बुमराह याला आपल्या संघात सामील करू इच्छित आहे. विशेष बाब म्हणजे या फ्रेंचांजीच्या कर्णधाराकडून ही खुली ऑफर सर्वांच्या समोर मिळाली आहे. ही फ्रेंचायजी दुसरे तिसरे कोणी नसून विराट कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे. मुंबई विरुद्ध झालेल्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसेस याने जसप्रीत बुमराह याला आपल्या संघात सामील होण्याची ऑफर दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

संघात सामील झाला तर...", बूम-बूम जसप्रीत बुमराहला आरसीबीच्या कर्णधाराकडून ओपन ऑफर..!

आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधार फाफ याला पराभवाचे कारण विचारल्यानंतर फाफ ने जसप्रीत बुमराह याचे तोंड भरून कौतुक केले. तो म्हणाला की,

मुंबई जवळ बुमराह आहे जो आमच्यावर दबाव राखण्यात यशस्वी ठरला. आमची धावसंख्या अधिक झाली असती पण जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केल्याने आम्ही 196 धावा करू शकलो. मी आणि पटीदार यांच्यात चांगली भागीदारी झाली पण बुमराहने ही भागीदारी मोडीत काढली.”

फाफ हसत हसत म्हणाला की,

‘जसप्रीत बुमराह हा आमच्या संघांमध्ये सामील झाला तर आम्हाला याचा आनंद होईल.’

त्यानंतर सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहचे फॅन्स जोरदार चर्चा करू लागले. जसप्रीत बुमराह लिलावात आला नाही. हे मुंबई इंडियन्ससाठी चांगले आहे, अन्यथा अनेक फ्रँचायझी बूम-बूमची वाट पाहत आहेत.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here