Viral Videoआयपीएल 2024

Viral Video: मयंक अगरवालने फ्लाईंग कीस देने पडले महागात, केकेआरच्या युवा गोलंदाजावर कारवाई, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

इंडियन प्रीमियर लीगमध्ये केवळ उत्कृष्ट खेळच दिसत नाही तर, खेळाडूंमध्ये भांडणेही होतात. कधी या वादावर हशा पिकवला जातो तर, कधी या वादामुळे गोष्टी बिघडतात. असाच एक छोटासा वाद काल पंजाब किंग्स आणि केकेआरमधील सामन्यात पाहायला मिळाला.    या घटनेत केकेआरच्या एका तरुण गोलंदाजाने वरिष्ठ खेळाडू मयंक अग्रवालसोबत गैरवर्तन केले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

केकेआरच्या गोलंदाजाने मयंक अग्रवालसोबत केले गैरवर्तन.

एसआरएचसाठी मयंक अग्रवाल या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. मयंक चांगली फलंदाजी करत होता आणि तो केकेआरच्या गोलंदाजांवर बारीक नजर ठेवत होता. 32 धावांवर अग्रवालने हर्षित राणाचा चेंडू सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला आणि उंच फटका मारला.

Viral Video: मयंक अगरवालने फ्लाईंग कीस देने पडले महागात, केकेआरच्या युवा गोलंदाजावर कारवाई, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

हा शॉट सीमारेषा ओलांडण्याऐवजी थेट रिंकू सिंगच्या हातात गेला. अग्रवाल आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने परत जाऊ लागला तेव्हा हर्षित राणाने त्याला शांत होण्याचा इशारा केला. एका तरुण खेळाडूने अनुभवी खेळाडूकडे केलेला हा हावभाव निष्पक्ष खेळाच्या विरोधात आहे.

हर्षित राणाच्या अश्या चुकीमुळे झाला तुफान ट्रोल..

हर्षित राणाने ज्या प्रकारे मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याच्याकडे बोट दाखवले. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, खेळात धावा करणे आणि आऊट होणे हे होतच असते. हा खेळाचा एक भाग आहे पण राणाने अग्रवालकडे केलेला हावभाव चुकीचा आहे.राणाने किमान मयंकच्या अनुभवाची तरी दखल घ्यायला हवी होती. तो केवळ 22 वर्षांचा आहे तर अग्रवाल 32 वर्षांचा आहे.

 

वरिष्ठ खेळाडूला असा सेंड ऑफ देणे योग्य होते का?

हर्षित राणा हा तरुण क्रिकेटपटू आहे. सध्या त्याचे लक्ष त्याच्या क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यावर आणि वरिष्ठ खेळाडूंकडून शिकण्यावर असले पाहिजे परंतु त्याऐवजी तो भारताकडून खेळलेल्या मयंक अग्रवालसारख्या वरिष्ठ खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. हे चुकीचे होते.

पहा व्हायरल व्हिडीओ,

वेगवान गोलंदाजाकडून आक्रमकता असावी पण ती गैरवर्तनाच्या स्वरूपात नसावी. मयंक अग्रवालच्या विकेटनंतर हर्षितने ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहता असे दिसते की तो संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि मागील हंगामातील कर्णधार नितीश राणा यांच्यावर खूप प्रभाव पडला आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहली वाद चांगलाच गाजला आहे. गेल्या मोसमात नितीश राणाचा मुंबईचा खेळाडू हृतिक शौकीनसोबतही वाद झाला होता.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button