केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली ते अश्विनने रचला इतिहास.. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीमध्ये झाले हे 12 विक्रम, भारतीय संघाच्या खेळाडूंनी मोडले दिग्गजांचे विक्रम..
आज शेर-ए-बांगला मैदानावर भारताने बांगलादेश संघाचा तीन गडी राखून पराभव केला आणि या कसोटी मालिकेत बांगलादेशचा क्लीन स्वीप केला. भारताने ही मालिका 2-0 अशी खिशात घातली. भारताने यापूर्वी एकदिवसीय मालिका गमावली होती.
बांगलादेशकडून मेहंदी हसनने दुसऱ्या डावात 5 बळी घेतले आणि भारताकडून दुसऱ्या डावात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने 62 चेंडूत 42 धावा केल्या. त्यांच्याशिवाय अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरनेही त्याला चांगली साथ दिली.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 12 ऐतिहासिक विक्रम, या विक्रमांवर एक नजर टाकूया.
1. या दुसऱ्या कसोटीत केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण केले.
View this post on Instagram
2. बांगलादेशविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाज जयदेवने 12 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तसेच या कसोटीत त्याने एक विकेट देखील घेतली.
3. रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 449 विकेट्स तसेच 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीत 3000 धावा आणि 400 हून अधिक विकेट्स पूर्ण करण्यापर्यंत, तो जगातील सर्वात कमी डावात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4. नजमुल शांतोने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.
5. चेतेश्वर पुजाराने या कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 7000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 8वा भारतीय खेळाडू ठरला.
View this post on Instagram
6. श्रेयस अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले.
7. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू नुरुल हसनने कसोटी क्रिकेटमध्ये 50 चौकार पूर्ण केले.
8. शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 बळींचा टप्पा पार केला.
9. भारताने 12 कसोटी सामन्यांनंतर पहिल्या डावात प्रथम फलंदाजी केली. शेवटच्या वेळी त्याने ऑगस्ट 2021 मध्ये हे केले होते.
10. केएल राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पहिली कसोटी मालिका जिंकली.
11. श्रेयस अय्यरने मागील 12 डावांमध्ये 650 हून अधिक धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० च्या वर आहे.

12. चौथ्या डावात भारतासाठी 7/ 8 व्या क्रमाकांच्या खेळाडूंची सर्वात मोठी पार्टनरशिप
74 एल अमर सिंग – लाल सिंग वि. इंग्लंड
71* एस अय्यर – आर अश्विन विरुद्ध बांगलादेश, आज
70 कपिल देव – एल शिवरामकृष्णन विरुद्ध श्रीलंका.