Cricket News

विश्वचषकातील पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का..! सलामीवीर शुभमन गिलला झाला डेंगू, पहिल्या सामन्यात खेळने कठीण; शुभमन च्या जागी ‘हा’ खेळाडू करू शकतो रोहित शर्मा सोबत डावाची सुरवात..

विश्वचषकातील पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का..! सलामीवीर शुभमन गिलला झाला डेंगू, पहिल्या सामन्यात खेळाने कठीण; शुभमन च्या जागी ‘हा’ खेळाडू करू शकतो रोहित शर्मा सोबत डावाची सुरवात..


विश्वचषक 2023 सुरु झाला आहे. भारताचा पहिला सामना हा २ दिवसाने म्हणजे 8 ऑक्टोबर रोजी आहे. पण त्याआधी भारतीय संघासाठी एक चिंतेची गोष्ट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेट विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium, Chennai) आयोजित सराव सत्रातही तो सहभागी झाला नाही.

शुभमन गिल

शुभमन गिल (Shubhman Gill) संघाचा अनुभवी फलंदाज असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना खेळला नाही तर, संघासाठी मोठी अडचण होऊ शकते .गिल रोहित शर्मासोबत सलामीचा फलंदाज म्हणून खेळत आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी डावाची सुरुवात कोण करणार याबाबत साशंकता आहे?

गिलच्या जागी कोण होणार कर्णधार रोहित शर्माचा पार्टनर ?

शुभमन गिल पहिल्या सामन्यात खेळणार नाही, हे जवळपास निच्छित झाले आहे. अश्या स्थितीमध्ये आता भारतीय चाहते त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळते याचे अनुमान लावत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शुभमनच्या अनुपस्थितीमध्ये  ईशान किशन रोहित शर्मा सोबत डावाची सुरवात करू शकतो.

किशनने याआधी अनेक वेळा भारतासाठी डावाची सलामी दिली आहे. सलामीवीर म्हणून त्याने द्विशतकही झळकावले आहे. अशा परिस्थितीत संघ त्याला रोहितसह डावाची सुरुवात करायला लावू शकतो. किशन बराच काळ चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळत असला तरी संघ त्याच्या क्रमांकाशी छेडछाड करण्याचा धोका पत्करेल की नाही हे व्यवस्थापनावर अवलंबून असेल.

विश्वचषकातील पहिल्या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का..! सलामीवीर शुभमन गिलला झाला डेंगू, पहिल्या सामन्यात खेळाने कठीण; शुभमन च्या जागी 'हा' खेळाडू करू शकतो रोहित शर्मा सोबत डावाची सुरवात..

विराट कोहलीही असेल दावेदार .

इशान किशनच्या स्थानात बदल न करण्याचा निर्णय घेतल्यास संघ अनुभवी फलंदाज विराट कोहलीवर सलामीची जबाबदारीही सोपवू शकतो. कोहली बराच काळ तिसर्‍या क्रमांकावर खेळत आहे, तरीही  त्याचा सलामीचा विक्रम तितकासा वाईट नाही. आणि तो आरसीबी साठी सलामीचा फलंदाज म्हणून खेळत आला आहे ज्यामुळे त्याच्याकडे डावाची सुरवात करण्याचा पुरेपूर अनुभव आहे.

आता ८ तारखेला होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा कोणाला आपल्यासोबत डावाची सुरवात करण्याची संधी देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button