Ranji Trophy Final: 19 वर्षाच्या मुशीरने तोडला सचिन तेंडुलकरच्या समोर बलाढ्य विक्रम; मुंबईची वाटचाल विजयाकडे!

Ranji Trophy Final: 19 वर्षाच्या मुशीरने तोडला सचिन तेंडुलकरच्या समोर बलाढ्य विक्रम; मुंबईची वाटचाल विजयाकडे!

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Ranji Trophy Final: मुंबई रणजी संघातील स्टार फलंदाज सरफराज खान याने रणजी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये सरफराज खानने बॅटचा जलवा दाखवला. त्यानंतर आता त्याचा छोटा भाऊ देखील मोठ्या भावांच्या पावलावर पाऊल टाकत रणजी क्रिकेटमध्ये (Ranji Trophy Final) दमदार कामगिरी करत आहे. मुंबई आणि विदर्भ यांच्या सुरू असलेल्या रणजीत चषकातील अंतिम सामन्यात त्याने मोठा पराक्रम केला आहे. मुशीर खानने 29 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने केलेला विक्रम मोडीत काढला.

आयपीएल 2008 मध्ये पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूंना मिळाली होती सर्वात मोठी रक्कम; पहिल्या सीजन नंतर मिळाली नाही पुन्हा खेळण्याची संधी!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विदर्भ आणि मुंबई यांच्यातील रणजी क्रिकेट मधला अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात मुशीर खान हा मुंबईच्या संघाकडून खेळत आहे. मुंबईच्या दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवशी त्याने अर्धशतकी खेळी केली तर तिसऱ्या दिवशी अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले.

Ranji Trophy Final: 19 वर्षाच्या मुशीरने तोडला सचिन तेंडुलकरच्या समोर बलाढ्य विक्रम; मुंबईची वाटचाल विजयाकडे!

यादरम्यान त्याने कर्णधार अजिंक्य रहाणे (72) सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केला. अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर श्रेयश अय्यरला (95) हाताशी धरून त्याने आपले दमदार शतक पूर्ण केले. यासह रणजी क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.

मुशीर खानने 255 चेंडूचा सामना करत शतक पूर्ण केले. हे शतक पूर्ण करताना त्याचे वय 19 वर्ष 22 दिवसांचे आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1994-95 मध्ये मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पंजाब विरुद्धच्या सामन्यांमध्ये दमदार 140 धावांची शतकी खेळी केली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकरचे वय 21 वर्षे होते. मुशीरने हा विक्रम आज मोडीत काढला. विशेष म्हणजे हा विक्रम मोडत असताना सचिन तेंडुलकर पॅवेलियनमध्ये बसून हा सामना पाहत होता.

यंदाच्या रणजी हंगामामध्ये मुशीरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. रणजी क्वार्टर फायनल मध्ये त्याने बडोदा संघाविरुद्ध 203 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर मुंबईने सेमी फायनल मध्ये मजल मारली. सेमी फायनलच्या सामन्यात देखील त्याने 55 धावांची बहुमूल्य खेळी केली आणि आज त्याने फायनल मध्ये शतक पूर्ण करत मुंबईला एका मजबूत स्थितीत नेऊन ठेवले.

मागील महिन्यात झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत मुशीरने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 7 सामन्यात 360 धावा केल्या होत्या, त्यात दोन शतकांचा समावेश होता. यासह त्याने गोलंदाजीत देखील योगदान देत सात गडी बाद केले. तसेच तीन महत्वपूर्ण झेल घेतले. एका खेळाडूला त्यांनी धावचित केले.

Ranji Trophy Final: 19 वर्षाच्या मुशीरने तोडला सचिन तेंडुलकरच्या समोर बलाढ्य विक्रम; मुंबईची वाटचाल विजयाकडे!

सामन्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मुंबईने विदर्भवर 500 हून अधिक धावांची मोठी आघाडी मिळवली आहे. सामन्यात मुंबईचे पारडे सध्या तरी जड वाटत आहे. मुंबईने आतापर्यंत 48 वेळा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. 48 पैकी 41 वेळा रणजी चषक मुंबईच्या संघाने उंचावला आहे.  मुंबईच्या नावावर सर्वाधिक वेळा रणजी चषक जिंकण्याचा विक्रम आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *