श्रीलंका संघात 2 खेळाडूंचा समावेश..! पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बोलवले ‘या’ अनुभवी खेळाडूंना

श्रीलंका क्रिकेट संघासाठी सध्या वाईट दिवस सुरू आहेत. विश्वचषक सुरू झाल्यापासून संघाच्या प्रमुख खेळाडूंना दुखापतीने घेरले आहे. त्यात भरीस भर म्हणून संघाचा विश्वचषक स्पर्धेत पराभवाची हॅट्रिक झाली आहे. पराभवाची ही मालिका खंडित करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दोन प्रमुख अनुभवी खेळाडूंना संघात राखीव खेळाडू म्हणून भारतात पाठवले आहे.

श्रीलंकेच्या संघामध्ये हे 2खेळाडू झाले सहभागी..

श्रीलंकेचा माजी कर्णधार अंजलो मॅथ्यूज आणि वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीरा यांची निवड केली असल्याची माहिती क्रिकेट बोर्डाने ट्विटर द्वारे दिली आहे. अंजलो मॅथ्यूज आणि वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीरा हे भारतात विमानाने थेट लखनऊ येथे शुक्रवारी दाखल होतील. श्रीलंकेचा पुढचा सामना नेदरलँड विरुद्ध 21 ऑक्टोबर रोजी लखनऊच्या मैदानावर होणार आहे.

श्रीलंका संघात 2 खेळाडूंचा समावेश..!  पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बोलवले 'या' अनुभवी खेळाडूंना

श्रीलंका क्रिकेट संघाला सुरुवातीला आशिया कप स्पर्धेत आणि आत्ता विश्वचषकसारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये स्पर्धेत छाप सोडता आली नाही. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला. संघातील सर्वच खेळाडू हे अनुभवहीन असल्याचे दिसून येतात. विश्वचषक स्पर्धेत काही खेळाडू हे दुखापतग्रस्त झालेत. म्हणून पर्याय खेळाडू म्हणून या दोन खेळाडूंना भारतात पाठवण्यात आले आहे.

माजी कर्णधार अंजलो मॅथ्यूज याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकली असता त्याने 221 सामन्यात श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 41 च्या सरासरीने 5865 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजी मध्ये 158 डावात 120 बळी घेतले आहेत. तर वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीरा 44 एकदिवसीय सामन्यात 50 गडी बाद केले आहेत.

ऐन विश्वचषक स्पर्धेत कर्णधार दासून शनाका दुखापतग्रस्त झाला. तो आता तीन आठवडे क्रिकेट खेळू शकत नाही. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची धुरा कुसल मेंडीस हा संभाळत आहे. दासूनच्या जागी पर्याय खेळाडू म्हणून चमिका करुणारत्ने याला संघात स्थान दिले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला स्टार फिरकीपटू वहिन्दू हसरंगा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

श्रीलंका

श्रीलंका क्रिकेट संघाने नेदरलँड विरुद्ध होणारा उद्याचा सामना गमावला तर त्यांना स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ येईल. कारण श्रीलंका संघ यापूर्वीच आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाविरुद्ध पराभूत झाला आहे. तसेच श्रीलंकेला यापुढे भारत आणि न्यूझीलंड सारख्या तगड्या संघाविरुद्ध दोन हात करावयाचे आहे. त्यांना पराभूत करणे अत्यंत अवघड आहे. 1996 मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषकावर नाव कोरले होते. त्यानंतर हा संघ 2007, 2011 साली अंतिम फेरीत पोहोचला होता. एकेकाळी स्टार खेळाडूंना भरलेला संघ सध्या मात्र दुबळा दिसतोय.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *