हे 2 दिग्गज भारतीय खेळाडू आयपीएल 2023 स्वतहून खेळणार नाहीत, कारण वाचून वाटेल अभिमान…
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा बिगुल वाजला आहे आयपीएल 2023 चा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे, ज्यासाठी जगभरातील 991 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. खरे तर आयपीएल हे एक असे व्यासपीठ आहे जिथे युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते.
अनेक खेळाडूंना या लीगचा भाग होण्याची इच्छा असताना, असे दोन खेळाडू आहेत जे या चकचकीत लीगपासून स्वत:ला दूर ठेवणार आहेत. होय भारतीय संघाच्या दोन दिग्गज खेळाडूंनी आयपीएलच्या ऑक्शनपूल मधून आपल नाव काढून घेतल आहे.
या स्पर्धेपासून दूर राहायचं,असं ठरवून त्यांनी आपल नाव यातून काढले आहे. नक्की कोण आहेत ते खेळाडू जाणून घेऊया या खास लेखामधून….

1. चेतेश्वर पुजारा) या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय कसोटी क्रिकेटमधील सर्वात अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराचे नाव आहे, जो कसोटीत आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पुजारा आयपीएल 2023 च्या लिलावात दिसणार नाही. किंग्ज इलेव्हन पंजाब किंग्जकडून 2014 मध्ये त्याने शेवटची आयपीएल खेळली. त्यानंतर तो आयपीएल खेळताना दिसला नाही. आयपीएल लिलावात त्याने अनेकवेळा आपले नाव जाहीर केले मात्र त्याला खरेदीदार मिळाला नाही.
मात्र यावेळेस पुजाराने स्वतहून मिनी लिलावात दिलेले आपले नाव वापस घेतले आहे. भारतीय संघाच्या युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून आपण या स्पर्धेत आता सहभागी होणार नसल्याचे पुजाराने म्हटले आहे. पुजाराच्या या निणर्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
पुजाराने आयपीएलमध्ये एकूण 30 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20.5 च्या सरासरीने फलंदाजी करताना 390 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 1 अर्धशतक देखील त्याच्या बॅटने दिसला आहे. पुजाराने शेवटचा आयपीएल सामना २०१४ मध्ये खेळला होता.
2. हनुमा विहारी) या यादीत हनुमा विहारी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जसे चेतेश्वर पुजाराही कसोटी विशेषज्ञ फलंदाजांमध्ये गणला जातो,तशीच काहीसी ओळख फलंदाज हनुमा विहारीची सुद्धा आहे.
View this post on Instagram
2019 मध्ये आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून शेवटचा सामना खेळला होता. यामुळेच कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीने त्याला जास्त संधी दिली नाही. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल लिलावातहीसहभागी होणार नाही.
आगामी मोसमात तो कौंटी क्रिकेट खेळतानाही दिसणार आहे. अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 14.2 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. त्याचवेळी आयपीएलमध्ये त्याचा सर्वोत्तम फलंदाजीचा विक्रम ४६ धावांचा आहे. याशिवाय त्याने एक विकेटही घेतली आहे. विहारी 2019 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…