Cricket News

आश्चर्यम..! आयपीएल सोडून काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळतोय इंग्लंडचा ‘हा स्टार क्रिकेटपटू..!

 

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुक याने वैयक्तिक कारण पुढे करून आयपीएल 2024 मधून अचानकपणे माघार घेतली होती. मात्र हा खेळाडू आता पुढे काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये खेळताना दिसणार आहे. काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये हा खेळाडू यॉर्कशायर संघाकडून खेळणार आहे. यॉर्कशायरच्या पहिल्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार आहे. यॉर्कशायरचा पहिला सामना 5 एप्रिल रोजी हेडिंगले येथे लीसेस्टरशायर विरुद्ध होणार आहे. हॅरी ब्रुक काऊंटी चॅम्पियनशिप मध्ये खेळणार असल्याची माहिती यॉर्कशायरचे मुख्य कोच ओटिस गिब्सन यांनी दिली.

हॅरी ब्रुकने डिसेंबर 2023 मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर इंग्लंडकडून खेळला होता. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आणि आयपीएल 2024 मधून त्याने अचानकपणे माघार घेतली होती. आयपीएल मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता.

आश्चर्यम..! आयपीएल सोडून काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळतोय इंग्लंडचा 'हा स्टार क्रिकेटपटू..

गिब्सन यांनी यॉर्कशायर वेबसाइटला सांगितले की, हॅरी ब्रूक हा आयपीएल मध्ये खेळताना दिसून येणार नाही. मात्र तो यॉर्क शायर संघाकडून लीसेस्टरशायर विरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल. यासोबत गिब्सन यांनी सांगितले की, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट हा देखील काऊंटी चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात यॉर्कशायर संघाकडून खेळणार असल्याची माहिती दिली.

हॅरी ब्रूक याने आयपीएलमध्ये न खेळण्याचे कारण काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे. ब्रूकच्या आजीचे निधन झाल्याने आयपीएल मधून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. तो म्हणाला की, माझ्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे होते. त्यामुळे मी आयपीएलमधून माघारी घेतली आहे. ती माझ्यासाठी एका पर्वतासमान होती. माझं बालपण तिच्याच घरी गेल आहे. माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये तिचे फार मोठे योगदान आहे. जीवनाविषयीचा माझा दृष्टिकोन आणि क्रिकेट वरील माझे प्रेम या दोन्ही गोष्टींना तिने आकार दिला होता.

आश्चर्यम..! आयपीएल सोडून काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळतोय इंग्लंडचा 'हा स्टार क्रिकेटपटू..

ब्रुक आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत होता. मागील वर्षी त्याने केकेआर संघाविरुद्ध दमदार शतक ठोकले होते. त्यानंतर मात्र त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आले नाही. त्याची बॅट शांतच राहिली. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला आयपीएल ऑक्शनच्या वेळेस रिलीज करून टाकले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला चार कोटी रुपयांमध्ये खरेदी करून आपल्या संघात दाखल करून घेतले.

आयपीएल अर्थातच इंडियन प्रीमियर लीग ही सर्वात मोठी लीग मानली जाते.  या लीग मध्ये खेळण्यासाठी  हजारो क्रिकेटपटू  धडपडत असतात. अनेक खेळाडूंना या लीगने लोकप्रियता मिळवून दिले आहे. केवळ लोकप्रियताच नव्हे तर पैशाने देखील अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. असे असताना हॅरी ब्रूकने आयपीएल सोडून काउंटि चॅम्पियनशिप मध्ये का खेळतोय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आयपीएल मधील फ्रेंचाईजी इंग्लंडच्या खेळाडूंना आपल्या संघामध्ये घेण्यासाठी उत्सुकता दाखवतात. मात्र बऱ्याचदा ते दुखापतीमुळे अथवा वैयक्तिक कारण पुढे करत आयपीएलमधून माघार घेतात. त्यामुळे त्याचा फटका संघांना बसत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button