न्यूझीलंड: २०२३ च्या विश्वचषकाप्रमाणेच इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०१९ मध्येही भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, संघाने लीग टप्पा संपल्यानंतर गटात अव्वल स्थान पटकावले होते. इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपद पटकावेल अशी आशा टीम इंडियासह चाहत्यांना होती पण तसे झाले नाही आणि टीम इंडिया उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडली.पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंची मनस्थिती कसी होती याबद्दल 4 वर्षानंतर संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी खुलासा केला आहे.
“2019 विश्वचषक उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर, एमएस धोनी, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यासह अनेक खेळाडूंना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ते ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडू लागले,असा खुलासा संजय बांगर यांनी केला आहे.
2019 च्या विश्वचषकाच्या सामन्यात अशा प्रकारे टीम इंडियाचा पराभव झाला होता.
विश्वचषक 2019 मध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाविरुद्ध 50 षटकात 239 धावा केल्या, भारतीय संघ 240 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. केवळ 5 धावांत त्याचे 3 विकेट. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि एमएस धोनीने शानदार खेळ करत सामना शेवटपर्यंत 6 विकेट्सवर 92 धावांवर नेला.
त्यानंतर ४८व्या षटकात रवींद्र जडेजा आणि ४९व्या षटकात एमएस धोनी बाद झाल्याने टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही संपुष्टात आले. न्यूझीलंडने हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे सामना बरोबरीत असताना त्यांना चौकारांच्या संख्येवर इंग्लंडने पराभूत केले.
याच सामन्यामधून टीम इंडियाचा विश्वचषक 2019 मधील प्रवास संपला होता. आता विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा टीम इंडियाने न्युझीलंडला हरवून विजय प्राप्त केला आहे. टीम इंडियाची ही कामगिरी अशीच चालू राहून संघाला विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी