Cricket Newsक्रीडावर्ल्डकप 2023

Most Dot Ball: विश्वचषक 2023 मध्ये या गोलंदाजांची हवा, फलंदाजांना सळो की पळो करून सोडत टाकलेत सर्वाधिक डॉट चेंडू….

World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 ही स्पर्धा फलंदाज आणि गोलंदाज आपल्या चमकदार कामगिरीने गाजवत आहेत. विश्वचषक स्पर्धेतील सामने जसजसे पुढे जातील तस तशी ही स्पर्धा रंगतदार अवस्थेमध्ये येत आहे

. प्रत्येक सामन्यात काहीतरी उलटफेर पाहायला मिळतोय. भारतीय संघातील खेळाडू देखील यामध्ये मागे नाहीत फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेला जिगरबाज कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सलग 5 सामने जिंकले आहेत. या विजयात फलंदाजा इतकेच क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजाचे देखील तितकेच योगदान आहे.

IND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: नाणेफेक जिंकनारा संघच ठरलाय विजयी, मागच्या काही सामन्यात फलंदाजानी काढल्यात एवढ्या धावा..

World Cup 2023:  विश्वचषक 2023  मध्ये सर्वांत जास्त डॉट बॉल टाकणारे फलंदाज..

 जसप्रीत बुमराह: भारतीय क्रिकेट संघाचा ब्रह्मास्त्र मानला जाणारा जसप्रीत बुमराह याने कमालीचे प्रदर्शन घडवले आहे. त्याने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यात 188 डॉट बॉल (निर्धाव चेंडू) टाकले आहेत. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये जसप्रीत बुमराह हा पहिल्या स्थानावर आहे.

IND vs NZ Most Dot Ball: विश्वचषक 2023 मध्ये या गोलंदाजांची हवा, फलंदाजांना सळो की पळो करून सोडत टाकलेत सर्वाधिक डॉट चेंडू....

ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषकातील पाच सामन्यात 163 चेंडू डॉट टाकले आहेत. भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा याने देखील पाच सामन्यात 159 चेंडू डॉट टाकले आहेत. तो सर्वाधिक चेंडू निर्धाव टाकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

Most Dot Ball: विश्वचषक 2023 मध्ये या गोलंदाजांची हवा, फलंदाजांना सळो की पळो करून सोडत टाकलेत सर्वाधिक डॉट चेंडू....

 हसन अली: पाकिस्तानचा संघ या विश्वचषक स्पर्धेत काही चमत्कार करू शकला नाही तरीही त्यांचा वेगवान गोलंदाज हसन अलीने 155 चेंडू निर्धाव टाकले आहेत. भारताचा चायनामॅन फिरकीपट्टू कुलदीप यादव हा देखील या यादीमध्ये पाचव्या स्थानावर विराजमान आहे. त्याने या विश्वचषकात 154 चेंडू निर्धाव टाकले आहेत.

Most Dot Ball: विश्वचषक 2023 मध्ये या गोलंदाजांची हवा, फलंदाजांना सळो की पळो करून सोडत टाकलेत सर्वाधिक डॉट चेंडू....

 मिचेल सॅन्टनर: विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत बोलायचं झाले तर, न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सॅन्टनर हा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 5 सामन्यात एकूण 12 गडी बाद केले आहेत. वरील यादीतील पाकिस्तानचा हसन अली वगळता इतर सर्व संघातील खेळाडूच्या कामगिरीचा फायदा आपापल्या संघाला झाला आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button