- Advertisement -

हे 3 भारतीय गोलंदाज करू शकतात अनिल कुंबळेच्या ‘एका डावात 10 विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी’, गेल्या अनेक वर्षापासून कुणीही नाही केलीय बरोबरी…

0 0

हे 3 भारतीय गोलंदाज करू शकतात अनिल कुंबळेच्या ‘एका डावात 10 विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी’, गेल्या अनेक वर्षापासून कुणीही नाही केलीय बरोबरी…


क्रिकेट जगतात असे अनेक विक्रम आहेत. ज्याला तोडता येत नाही. त्यातील एक विक्रम अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध केला आहे. जिथे त्याने एका डावात सर्व 10 विकेट घेतल्या. दिल्लीच्या कसोटी सामन्यात कुंबळेने हे यश संपादन केले होते. आता हा विक्रम मोडणे तर जवळपास अशक्यच आहे. कारण कोणताही गोलंदाज 10 पेक्षा जास्त विकेट एका डावात घेऊच शकत नाही.

पण  भारतीय संघाच्या सध्याच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर असे अनेक गोलंदाज दिसतात जे अनिल कुंबळेच्या या विक्रमाशी बरोबरी करण्याची क्षमता सांभाळून आहेत.   या खेळाडूंनी अलीकडच्या काळात मॅचविनिंग गोलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे.

आज आम्ही तुम्हाला त्या 3 भारतीय गोलंदाजांबद्दल सांगणार आहोत.  जे अनिल कुंबळेच्या १ ० विकेटच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतात या यादीत समाविष्ट असलेल्या खेळाडूचे नाव तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. मात्र, त्या खेळाडूने अलीकडच्या काळात भारतीय संघासाठी मोठी कामगिरी केली आहे.

1. जसप्रीत बुमराह:आजच्या काळात, जेव्हा आपण भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलतो, तेव्हा जसप्रीत बुमराहला सर्वात धोकादायक गोलंदाज म्हणून पाहिले जाते. जरी त्याने आतापर्यंत कमी कसोटी सामने खेळले असले तरीही.. मात्र कमी सामन्यांमध्ये त्याने फलंदाजांमध्ये भीती पसरवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये 14 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 20.34 च्या सरासरीने 68 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी त्याने 2.69 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि 5 वेळा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला. त्याने एका सामन्यात 9 विकेट्सही घेतल्या आहेत.

एका डावात सर्वाधिक ६ बळी घेण्याचा पराक्रम बुमराहने केला आहे. पण पुढच्या वेळी तो इंग्लंडच्या भूमीवर खेळताना दिसणार आहे. जिथे जसप्रीत बुमराहला स्विंग मिळताच तो एका डावात सर्व विकेट्स मिळवण्याचा पराक्रम करताना दिसू  शकतो.

2. रविचंद्रन अश्विन: अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा पराक्रम करण्यात यशस्वी ठरू शकतो. भारतीय खेळपट्ट्यांवर सामन्याच्या दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन सुरुवातीपासूनच गोलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे त्याला सर्व 10 विकेट्स घेण्याचीही संधी असेल.

रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये 71 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 25.43 च्या सरासरीने 365 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी त्याने 2.84 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि 27 डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला. तर 7 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.

अनिल कुंबळे

अश्विनने एका डावात 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आता लवकरच अनिल कुंबळेप्रमाणे एका सामन्यात भारतीय संघासाठी एका डावात सर्व 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला असेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय भूमीवर हा पराक्रम करण्यात अश्विन यशस्वी होऊ शकतो.

3. मोहम्मद शमी: मोहम्मद शमी भारतीय कसोटी संघाचा दीर्घकाळ भाग असलेला मोहम्मद शमी गेल्या काही वर्षांत खूपच चांगला दिसत आहे. विकेट घेण्याच्या बाबतीत तो सतत पुढे जाताना दिसतो. मोहम्मद शमी विदेशी भूमीवर अधिक धोकादायक गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे.

मोहम्मद शमीने आतापर्यंत कसोटी फॉरमॅटमध्ये 49 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 27.36 च्या सरासरीने 180 विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी 3.32 च्या इकॉनॉमीने त्याने धावा दिल्या आणि 5 डावात 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला. त्याने एका सामन्यात 9 विकेट्सही घेतल्या आहेत.

एका डावात सर्वाधिक ६ बळी घेण्याचा पराक्रम शमीने केला आहे. पण पुढच्या वेळी तो एका डावात सर्व 10 विकेट घेण्याचा पराक्रम करू शकतो.

तर मित्रानो हे होते काही खास भारतीय गोलंदाज जे अनिल कुंबळे यांच्या 10 विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची क्षमता सांभाळून आहेत. येत्या काही वर्षात किंवा दिवसांत यांपैकी कोणी जर अशी कामगिरी केली तर आच्छर्य नको वाटायला.


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

VIRAL VIDEO: नसीम शहाने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाला काही कळायच्या आतचं उडाले स्टंप, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

Leave A Reply

Your email address will not be published.