- Advertisement -

ब्रेकिंग न्यूज: टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह आणि हे 3 मोठे खेळाडू WTC अंतिम सामन्यातून बाहेर…

0 0

ब्रेकिंग न्यूज: टीम इंडियाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह सह हे 3 मोठे खेळाडू WTC अंतिम सामन्यातून बाहेर…


WTC FIANAL2023: भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2023) च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. जिथे टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. इंग्लंडची भूमी असलेल्या ओव्हलवर 7 जून रोजी हा महान सामना रंगणार आहे.

कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी भारतीय संघातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये भारताला एक नव्हे तर तीन खेळाडूंच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. जे WTC (WTC फायनल) च्या अंतिम सामन्याचा भाग बनू शकणार नाहीत.

हे 3 खेळाडू डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यापूर्वी बाहेर पडले.

 

जसप्रीत बुमराह : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसापासून टिम इंडियातून बाहेर आहे. त्याच्यावर काही दिवसापूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली असून, बुमराह सध्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे. रिपोर्टनुसार बुमराहला फिट होण्यासाठी  सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. ज्यामुळे त्याला आता WTC च्या अंतिम सामन्यातून वगळण्यात आलयं. महत्वाच म्हणजे बुमराह मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2023 सुद्धा खेळू शकणार नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

ऋषभ पंत: WTC च्या अंतिम सामन्यातून बाहेर झालेला आणखी एक खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. टिम इंडियाचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंतच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी कार अपघात झाला होता. ज्यानंतर पंत आता त्यातून सावरत आहे. मात्र अस असले तरीही पंतची दुखापत गंभीर असल्याने तो जवळपास वर्षभर तरी मैदानावर खेळू शकणार नाही. याच कारणामुळे तो सुद्धा WTC च्या अंतिम सामन्याचा हिस्सा नसणार आहे.

जसप्रीत बुमराह

श्रेयस अय्यर: टिम इंडियाचा युवा फलंदाज आणि केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर देखील WTC अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यर औस्ट्रोलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात जखमी झाला. ज्यानंतर आता तो रिकव्हर व्हायला बराच वेळ जाणार असल्याचे त्याच्या मेडिकल टेस्टमध्ये सिद्ध झाले. ज्यामुळे बीसीसियायने त्याला देखील अंतिम सामन्यातून बाहेर केले.

आता या तिघांच्या जागी कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हे ही वाचा..

“ये तो सस्ता हरभजन सिंह निकला” शुभमन गिल च्या गुगलीवर स्टेडियम मधील लोकांनी केला एकच कल्ला.   शुभमनची बॉलिंग पाहून विराट-रोहितला हसू आवरता आले नाही, VIDEO झाला व्हायरल

रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार

चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…

Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…

Leave A Reply

Your email address will not be published.