क्रीडा

केन विल्यमसनच्या या 3 चुकांमुळे पाकिस्तान पडला न्यूझीलंडवर भारी, केल्या नसत्या ह्या चुका तर न्यूझीलंड असता फायनलमध्ये..

केन विल्यमसनच्या या 3 चुकांमुळे पाकिस्तान पडला न्यूझीलंडवर भारी, केल्या नसत्या ह्या चुका तर न्यूझीलंड असता फायनलमध्ये..


टी-२०विश्वचषक २०२२ चा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी येथे खेळला गेला, जिथे पाकिस्तान संघाने किवींचा ७ गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने २० षटकात ४ गडी गमावून १५२ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान रुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किवी संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती, पण मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या डॅरिल मिचेलने आपल्या संघाचा डाव सांभाळला आणि दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या.

मिचेलशिवाय कर्णधार केन विल्यमसनने किवीजसाठी संयमी खेळी खेळली. त्याने या सामन्यात ४२ चेंडूत १ षटकार-१ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. त्याच्याशिवाय कॉनवेने २१ तर जेम्स नीशमने नाबाद १६ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २ तर नवाजने १ विकेट घेतली.

१५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला तेव्हा सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके झळकावली. त्याने ४२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याचवेळी मोहम्मद रिझवानने ४३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या.

केन विल्यमसन

उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या या सामन्यात केन विल्यमसनने ४२ चेंडूत ४६ धावांची संथ खेळी खेळली, त्याची ही खेळी न्यूझीलंड संघाच्या पराभवाचे कारणही ठरली. विल्यमसनने ही चूक केली नसती आणि वेगवान फलंदाजी केली असती तर कुठेतरी या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

चुकीचा फटका खेळून बाद झालेला कर्णधार केन विल्यमसन स्वतः पराभवाचे एक मोठे कारण आहे. दुसरे कारण म्हणजे धावा काढण्यात न्यूझीलंडचे  फलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तान संघाला चांगले लक्ष देण्यास न्यूझीलंड अपयशी ठरला आणि मिळाले लक्ष पाकिस्तानने सहज जवळ केले. जर आणखी वीस तीस धावा जास्त केल्या असत्या तर सामन्याचा निकाल काही वेगळा असता.  तिसरी आणि महत्वाची चूक म्हणजे चुकीच्या जागी चुकीच्या गोलंदाजाना गोलंदाजी करण्यास बोलावणे. केनने संपूर्ण सामन्यात गोलंदाजाच्या अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला. त्यामुळेच गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले. परिणामी न्यूझीलंडला घरचा रस्ता धरावा लागला.. 


हेही वाचा:

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

न्यूझीलंड विश्वचषकमधून बाहेर तर फेकला गेला मात्र, कर्णधार ‘केन विल्यमसन’ जाता जाता भारताच टेंशन वाढवणार वक्तव्य करून गेलाय..

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button