हे 3 खेळाडू मोडू शकतात रोहित शर्माचा 264 धावांचा विक्रम, एकजण तर आहे तुफान फोर्ममध्ये गेल्याच सामन्यात ठोकलंय दुहेरी शतक..
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने फलंदाजी करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.त्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट मर्यादित षटकांच्या खेळाडूंमध्ये केली जाते.एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे.
वर्ष 2014 मध्ये रोहितच्या नावावर श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची इनिंग खेळण्यात यशस्वी झाला, त्याने बनवलेला हा विक्रम आजतागायत मोडला नाही, पण क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की ‘विक्रम हे मोडण्यासाठीच रचले जातात”. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण अश्या 3 फलंदाजांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याकडे रोहित शर्माचा हा विक्रम मोडण्याची पूर्ण क्षमता आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते खेळाडू..
View this post on Instagram
सूर्यकुमार यादव: या यादीत भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या धडाकेबाज फलंदाजाने आतापर्यंत भारतासाठी अनेक एकदिवशीय सामने खेळले असून सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने 23 T20 मध्ये 40.05 च्या सरासरीने आणि 184 च्या स्ट्राईक रेटने 801 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यादरम्यानही हा धडाकेबाज फलंदाज अशाच तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडण्याची पूर्ण क्षमता आहे.

जोस बटलर: इंग्लंडचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज जोस बटलरने 130 डावांमध्ये 40.42 च्या सरासरीने 42.45 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 162 आहे. जर आपण बटलरच्या 2022 च्या कामगिरीबद्दल बोललो तर त्याने 7 डावात 74.60 च्या सरासरीने 373 धावा केल्या. यासोबतच त्याने एक अर्धशतक आणि दोन शतके झळकावली आहेत. रोहितचा हा विक्रम मोडण्याची क्षमताही बटलरकडे आहे.
बाबर आझम: या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावाचाही समावेश आहे. त्याच्या 59.79 च्या सरासरीने 4664 धावा आहेत. बाबर आझमने 2022 मध्ये 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 84.87 च्या सरासरीने 679 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतकेही केली आहेत. रोहितचा २६४ धावांचा विक्रम मोडण्याची क्षमताही बाबर आझमकडे आहे.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.