लायकी असूनही या ३ खेळाडूंना कधीही संघात दिले गेले नाही स्थान, एकाने तर काढल्यात खोऱ्याने धावा, तरीही केले दुर्लक्षित..!
लायकी असूनही या ३ खेळाडूंना कधीही संघात दिले गेले नाही स्थान, एकाने तर काढल्यात खोऱ्याने धावा, तरीही केले दुर्लक्षित..!
भारतीय संघाने आजवर अनेक खेळाडू घडवले आहे. भारतीय संघात घडविलेल्या खेळाडूंनी जगभरात क्रिकेट या क्षेत्रात आपले नाव उच्च कोटीचे बनवले आहे. इथे एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्या यादीवर येतात. ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असो किंवा धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग.. या सोबतच सौरभ गांगुली, अनिल कुंबले, जहीर खान, महेंद्रसिंग धोनी, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, हरभजन सिंग इत्यादी अनेक नावे समोर येतात. भारतीय संघातल्या पारंगत खेळाडूंची नावे घेता घेता आपण थकून जाऊ. आणि एक गोष्ट या खेळाडूंनी नक्की केली ती म्हणजे आपल्या स्वतःच्या समर्पणाने यांनी क्रिकेट या खेळाला संपूर्ण जगात मानाचे स्थान प्राप्त करून दिले.
मोठा चाहत्यांचा वर्ग क्रिकेट विषयी संपूर्ण जगभर निर्माण झाला. आज आपण पाहतो की जिथे कुठेही मॅच असली तेव्हा प्रत्येक स्टेडियम हे भरगच्च संख्येने भरले असते. प्रेक्षक एका पायावरती मॅच पाहायला जायला तयार होतात. याचे श्रेय सर्व समर्पित खेळाडूंना जाते. त्यांनी या खेळाची गुणवत्ता अधिकाधीक वाढती ठेवली. भारतीय संघात अनेक खेळाडू घडले तसेच अनेक खेळाडू घडलेसुद्धा असते. मात्र काही खेळाडूंना जास्त संधी मिळाल्या नाही. त्यामुळे हे लोक आपली प्रतिभा सिद्ध करू शकले नाही.
वास्तविक पाहता हे खेळाडूही प्रतिभासंपन्न असे खेळाडू होते. मात्र संधी न मिळाल्याने यांना नावारुपास येता आले नाही. अन्यथा सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर अशा सगळ्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंची सुद्धा नावे आपण आवडीने घेतली असती. ते कोणते खेळाडू आहेत ज्यांना भारतीय संघात पुरेसे खेळण्याची संधी मिळाली नाही ते आपण जाणून घेऊ.

मुरली कार्तिक:
साल 2000 रोजी मुरली कार्तिक ने भारतीय संघात पदार्पण केले. तो उजव्या हाताने स्पिनिंग करून बॉलींग करत होता. मुरलीच्या नावावर सुमारे 641 विकेट्स आहे. याला वनडे मध्ये फारसे खेळायला मिळालेच नाही. मुरली कार्तिक मध्ये एवढी क्षमता होती ज्यानी स्वतःच्या भरोशावरती तो मॅच जिंकण्याची ताकद ठेवायचा. मुरलीने आपली शेवटची टेस्ट मॅच 2007 साली खेळली. तर वनडे मॅचला 2004 सालापासूनच रामराम केला. कारण अनिल कुंबले आणि हरभजन सिंग या जोडीने भारतीय संघात आपले पाय घट्ट रोवलेले असल्यामुळे कार्तिक कडे फारशा संधी आल्याच नाही.
इरफान पठाण:
भारताचा स्टार, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून इरफान पठाण एकेकाळी खूप गाजला. इरफान टेस्ट, वनडे, टी ट्वेंटी अशा सर्वच प्रकारांमध्ये जोरदार खेळाचे प्रदर्शन करत होता. त्याच्या नावाने अनेक विकेट्स आहेत. उजव्या हाताने जलद गतीने बॉलिंग करणारा हा खेळाडू असून अनेक मॅच मध्ये आपल्या बॅटिंग ने प्रतिस्पर्धी बॉलर्सला एका प्रोफेशनल बॅट्समनलासुद्धा लाजवेल असे रन काढून आपण पक्के ऑलराऊंडर आहोत हे इरफानने सिद्ध केले. यालाही कायमचे स्थान मिळाले नाही. नाहीतर इरफान सुद्धा जगातील टॉप टेन खेळाडूंमध्ये आला असता.
_मनोज तिवारी_:
फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये ५०च्या ऍवरेजने रन्स काढणारा मनोज तिवारी या खेळाडूला सुद्धा आपले स्थान कधीच भारतीय संघात पक्के करता आले नाही. हा नेहमी आत बाहेर असाच होत राहिला. 2008 साली डेब्यू करणारा मनोज तिवारी मात्र १३ वनडे आणि ३ टी ट्वेंटी सामन्या शिवाय मनोजच्या पुढ्यात विशेष सामने आलेच नाही. त्यामुळे याला स्वतःला जागतिक क्रिकेटपटलावर सिद्ध करता आले नाही. मनोज हा एक जोरदार फिल्डर सुद्धा होता. अनेक वेळा आपल्या उत्तम फील्डिंग चे नमुने याने सादर केले आहे. मात्र दुर्दैव म्हणावं की काय मनोज कधीच भारतीय संघाचा स्थिर खेळाडू होऊ शकला नाही.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..