केवळ आयपीएल स्टार बनून राहिलेत ‘हे’ 3 स्टार भारतीय खेळाडू, देशासाठी खेळायच्या वेळेस नेहमी जखमी होऊन बसतात संघाबाहेर..
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू नेहमीच सक्रियपणे भाग घेतात. जिथे त्यांना खेळण्याच्या रुपाने करोडोंची फी दिली जाते. IPL 2023 चा 16 वा सीझन काही दिवसातच सुरु होत आहे. अश्यातच आता अनेक जखमी झालेले खेळाडू आयपीएलमधून पुनरागमन करण्यास उत्सुक आहेत.
आम्ही या लेखात अशा 3 भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. जेव्हा त्याच्या देशासाठी खेळण्याची वेळ येते तेव्हा ते संघाबाहेर किंवा दुखापतग्रस्त होतात आणि आयपीएलच्या वेळेला बरोबर संघासोबत जोडल्या जातात..
1. जसप्रीत बुमराह: या यादीत आम्ही भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराहला पहिल्या स्थानावर ठेवले आहे, जो बर्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघातून जरी अनेक दिवस जस्सी बाहेर राहिला असला तरीही तो आजपर्यंत एकही आयपीएल सीजन मधून बाहेर पडलेला नाहीये.
देशासाठी खेळण्याची गरज असताना तो नेहमीच जखमी होऊन संघाबाहेर पडलेला पहावयास मिळतो. मागच्या वर्षात बोलायचं झाले तर बुमराह आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. यामागे त्याच्या जखमी होण्याचे कारण देण्यात आले होते.

त्यामुळे टीम इंडियाला दोन्ही मोठ्या टूर्नामेंटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत तो तंदुरुस्त झाल्याची बातमी आली होती. पण तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही, त्यामुळे बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा भागही नाही. मात्र तो आयपीएलमध्ये पुनरागमन करताना दिसण्याची शक्यता आहे.
2. रवींद्र जडेजा: भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा बराच वेळ संघाबाहेर होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो टीम इंडियाचा भाग नव्हता. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे स्टार अष्टपैलू जड्डू गायब होता.
View this post on Instagram
जडेजा असल्यामुळे टीम इंडियाला ताकद मिळते. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही ठिकाणी तो आपले योगदान नक्की देतोच. याचे उदाहरण ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतून घेता येईल. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार पुनरागमन केले आहे. पण बहुतेकदा तो दुखापतीमुळे बाहेर दिसतो. पण त्याची उपस्थिती आयपीएलमध्येमात्र 100% दिसून येते.
3. रोहित शर्मा: या यादीत तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार ‘रोहित शर्मा’ .रोहित सुद्धा त्या भारतीय खेळाडूमध्ये मोडतो जो भारतीय खेळाडू वर्षातील बरेच दिवस जखमी होण्याच्या कारणाने संघाबाहेर असतो.
View this post on Instagram
भारतीय संघात खेळताना कर्णधार पदाची जबाबदारी असूनही त्याला त्याच्या खराब फिटनेसमुळे बाहेर पडावे लागते पण दुखापतीमुळे रोहित आयपीएलमध्ये क्वचितच बाहेर पडताना दिसला आहे. अशा परिस्थितीत, चाहते देखील खेळाडूंवर आरोप करतात की ते आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फिट आहेत आणि देशासाठी खेळण्यासाठी फिट नसल्याची माहिती देतात.
तर मित्रानो हे होते काही खेळाडू जे आयपीएल मध्ये खेळण्यास नेहमी फिट असतात मात्र देशासाठी खेळतांना जखमी असतात. यांच्या व्यतिरिक्त आणखी असे कोणते खेळाडू आहेत ते कमेंट करून नक्की सांगा.
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..