सूर्यकुमार यादव नाही तर हे 3 खेळाडू होते ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या कसोटी संघात खेळण्याचे खरे हकदार, बीसीसीआयच्या चुकीच्या निवडीमुळे बसतोय त्यांना फटका…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. यासाठी 2 सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इशान किशनलाही यष्टिरक्षक म्हणून प्रथमच कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
त्याचबरोबर फलंदाज सूर्यकुमार यादवचाही कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पण, त्याच्या रेकॉर्ड फर्स्ट क्लासमध्ये काही खास नाही. रणजी ट्रॉफीमध्ये सतत स्वत:ला सिद्ध करणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही. मात्र निवड समितीने सूर्याच्या टी-२० फलंदाजीस प्राधान्य देत त्याला संघात जागा दिली. परंतु खरे पाहता कसोटीच्या दृष्टीने दुसरे खेळाडू या संघात खेळण्याचे हकदार होते.
View this post on Instagram
या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे सूर्यापेक्षा या संघात स्थान मिळवण्यास पात्र होते.
1. सरफराज खान: रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय खेळाडू सरफराज खानच्या बॅटने आग लावली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो धावा करत आहे. 25 वर्षीय फलंदाज सर्फराज खान गेल्या दोन सत्रांपासून रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खूप मजबूत खेळ दाखवत आहे.
2019-20 च्या मोसमात त्याने 928 धावा केल्या होत्या आणि गेल्या मोसमात 982 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादवच्या जागी सरफराज खानची निवड होऊ शकते. जो या फॉरमॅटमध्ये सूर्यापेक्षा चांगला पर्याय ठरू शकला असता मात्र हे सर्व माहिती असूनही निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले..

2. अभिमन्यू ईश्वरन: अभिमन्यू ईश्वरन हा महान फलंदाज आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये धावत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये ३ जानेवारीपासून उत्तराखंड आणि बंगाल यांच्यात सामना खेळवण्यात आला. बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने या सामन्यात शतक झळकावले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यू आपली क्षमता सिद्ध करत आहे. त्याची चमकदार कामगिरी पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचा संघात समावेश करण्याची मागणी केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी ईश्वरनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी दिली जाऊ शकते. सूर्या हा T20 चा स्पेशालिस्ट खेळाडू आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.
3. यशस्वी जैस्वाल: भारतीय युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत खूप प्रभाव पाडला आहे. या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक लांबलचक खेळी खेळल्या आहेत. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, तो कसोटी फॉरमॅटमध्ये ‘लंबी रेस का घोडा’ आहे. त्यामुळे त्याला सूर्याच्या जागी संधी दिली असती तर परिणाम चांगलेच मिळाले असते ,हे मात्र नक्की.
जैस्वालने दिलीप ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याने केवळ 323 चेंडूत 265 धावा केल्या. जैस्वालची देशांतर्गत क्रिकेटची आकडेवारी देखील प्रभावी आहे, त्याने 13 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 63 च्या सरासरीने 1474 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 शतके आणि 2 अर्धशतकांचाही समावेश आहे.
तर मित्रानो, हे होते ते काही खेळाडू ज्यांना ऑस्ट्रोलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सूर्कुमार यादवच्या जागी संधी द्यायला हवी होती, मात्र निवड समितीने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…