Records: या 3 भारतीय फलंदाजांनी कसोटी आणि ODI दोन्ही मध्ये ठोकलेत द्विशतक, एकाने तर तब्बल 3 वेळा केलाय असा पराक्रम..

Records: या 3 भारतीय फलंदाजांनी कसोटी आणि ODI दोन्ही मध्ये ठोकलेत द्विशतक, एकाने तर तब्बल 3वेळा केलाय असा पराक्रम..

Records: क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणं सोपं काम नाही. शतक झळकावण्यासाठी खेळाडूला बराच वेळ क्रीजवर राहून फलंदाजी करावी लागते आणि काही उत्कृष्ट शॉट्सही खेळावे लागतात. त्याचबरोबर द्विशतक झळकावायचे असेल तर ,ते काम आणखी कठीण होऊन बसते. द्विशतक करण्यासाठी कोणत्याही खेळाडूला तासन्तास फलंदाजी करावी लागते.

आतापर्यंत अनेक भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकले आहे. कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, तर सध्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीही त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहे. विराट कोहलीने आतापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक भारतीय फलंदाजांनी द्विशतके झळकावली आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, करुण नायर यांसारख्या खेळाडूंची नावे ठळक आहेत, पण वनडेमध्ये द्विशतक झळकावण्याचा विचार केला तर आतापर्यंत केवळ 3 खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. त्याच वेळी, वनडे आणि कसोटी या दोन्ही प्रकारात द्विशतक ठोकण्याचा विक्रम केवळ 3 भारतीय फलंदाजांच्या नावावर आहे.

आज आम्ही तुम्हाला  या विशेष फिचर मध्ये त्या 3 भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात द्विशतके झळकावून मोठा विक्रम केला आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू.

या भारतीय खेळाडूंनी कसोटी आणि एकदिवशीय दोन्ही फोर्मेटमध्ये झळकावलेत द्विशतक.

रोहित शर्मा (Rohit Sharma)

Ind vs Eng 1st test: पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची मोठी चूक.. संघाला होऊ शकते नुकसान, या सामनावीर खेळाडूला केले संघातून बाहेर; चाहते भडकले..!

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडेमध्ये 3 द्विशतके झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी खूप कठीण असते परंतु रोहित शर्माने आतापर्यंत केवळ 3 द्विशतके झळकावली आहेत. त्याच्याकडे 150 च्या वर अनेक डाव आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा (२६४ धावा) करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे.

रोहित शर्माने केवळ एकदिवसीयच नाही तर ,कसोटी क्रिकेटमध्येही अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. 2013 मध्ये जेव्हा त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले तेव्हा पहिल्याच सामन्यात त्याने 177 धावांची जबरदस्त इनिंग खेळली होती. याशिवाय त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतकही आहे. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात, रोहित शर्माने 212 धावांची खेळी खेळली, जी त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याही आहे.

२.वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag)

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचाही अशा खेळाडूंमध्ये समावेश आहे ज्यांनी, कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमध्ये द्विशतके झळकावली आहेत. वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे. त्याने 8 डिसेंबर 2011 रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध झटपट द्विशतक झळकावले. सेहवागने अवघ्या 149 चेंडूंत 25 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 219 धावांची खेळी केली होती.

Records: या 3 भारतीय फलंदाजांनी कसोटी आणि ODI दोन्ही मध्ये ठोकलेत द्विशतक, एकाने तर तब्बल 3वेळा केलाय असा पराक्रम..

1.सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेट इतिहासात द्विशतक करणारा पहिला फलंदाज होता. 2010 मध्ये ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने द्विशतक झळकावले नव्हते आणि तेंडुलकर हा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला.

 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याबरोबरच सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्येही 6 वेळा द्विशतक झळकावले आहे. त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या 248 आहे. (3 INDIAN PLAYERS WHO HIT DOUBLE CENTURY IN ODI & TEST FORMATE)


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *