क्रीडाCricket Newsवर्ल्डकप 2023

IND VS AFG: मुंबईच्या पट्ट्याचा दिल्लीत मोठा कारनामा; श्रेयस अय्यरने ठोकला सर्वात मोठा षटकार!

IND VS AFG श्रेयस अय्यर: भारताचा हुकमी एक्का आणि स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात एक नवा कारनामा केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या श्रेयशने दुसऱ्या सामन्यात तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजासाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर श्रेयशने 101 मीटर चा षटकार लगावला आहे.  श्रेयसचा हा षटकार यंदाच्या विश्वचषकातील सर्वांत मोठा षटकार आहे.

श्रेयस अय्यरने ठोकला सर्वात मोठा षटकार

अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीबउर रहमानच्या चेंडूवर श्रेयसने हा मोठा षटकार ठोकला आहे. 2023 च्या विश्वचषकात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा षटकार ठरला आहे. विश्वचषकातील अफगाणिस्तान विरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात 23 चेंडूत 25 धावांची खेळ करत नाबाद राहिला. विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आशिया कप’ स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली होती. 2023 हा त्याचा पहिला विश्वचषक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो मोठा फटका लगावण्याच्या नादात तो शून्य धावसंख्येवर बाद झाला.

श्रेयस अय्यर
image courtesy- BCCI

IND VS AFG सामन्याबद्दल..

सामन्याबाबतीत बोलायचं झाले तर, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कर्णधार शाहिद (80) तर अजमतुल्लाह ने (62) धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने 50 षटकात 8 बाद 272 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह याने 4 तर हार्दिक पांड्या यांनने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दमदार सुरुवात करत अफगाणिस्तानची गोलंदाजी भारतीय सलामीवीरांनी फोडून काढली. रोहित शर्माने त्याचे विश्वचषकातील सातवे दमदार शतक ठोकले. त्याने 84 चेंडूवर 16 चौकार आणि 5 षटकारांच्या 156 धावा केल्या. तर विराट कोहलीने अर्धशतक ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

नेदरलँड चा खेळाडू स्कॉट एडवर्ड्स याने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 87 मीटर चा षटकार खेचला. या सामन्यात नेदरलँड चा न्यूझीलंडने पराभव केला. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोश बटलर यांनी न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 88 मीटर लांब षटकार ठोकला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना 89 मीटरचा षटकार ठोकला. काल अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा ने शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्यानेही एक उत्तुंग 93 मीटर लांबीचा संसणीत षटकार ठोकला.


PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button