भारतातील या प्रसिद्ध क्रिकेट मैदानावर आजपर्यंत एकही अंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाहीये,करोडोंचा खर्ज करून आजही आहेत तसेच!
भारतातील या प्रसिद्ध क्रिकेट मैदानावर आजपर्यंत एकही अंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाहीये..
आपल्या भारत देशात क्रीडाप्रेमींची संख्या परंपरागत आहे. सनातन काळापासूनच क्रीडा हा आपल्या देशात समाजमान्य आणि सर्वमान्य असा विषय झाला असून दिवसेंदिवस अधिकाधिक क्रीडाक्षेत्र डेव्हलपच होत गेले आहे. आज आपल्या देशात खेळण्याच्या अनेक सुविधा आहे. चांगले कोच आहे. खेळावयाला लागण्यासाठी आवश्यक साधन सामग्री सुद्धा आहे. पाहिजे ते आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाने क्रीडा या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे.
क्रिकेटचा विषय आपण जर घेतला तर आपल्या देशात क्रिकेट साठी उपयुक्त असे अनेक मैदान आहे. काही राज्यात तर तीन-तीन, चार-चार आहेत. आपल्या महाराष्ट्रात जर आपण पाहिले तर मुंबईत २, पुण्यात १ आणि नागपुरात १ असे ४ मैदान एकट्या महाराष्ट्रात आहे. अशाच प्रकारची स्थिती गुजरातमध्ये सुद्धा आहे.

सामान्यपणे डिजिटल शहरात किंवा मोठ्या संख्येच्या शहरात अशा प्रकारची मैदाने बनवण्यावर फोकस केला जातो. त्यामागचे कारणही साहजिकच असते की मोठ्या शहरात संख्या जास्त असल्याकारणाने क्रिकेट पाहण्यात या प्रेक्षकांची संख्या सुद्धा साहजिकच जास्त राहते. त्यामुळे सामान्यपणे अशा मोठ्या शहरांवर फोकस केला जातो. पण काही मैदानांच्या बाबतीत लोकसंख्या मोठी असणे काही फायद्याचे सिद्ध झालेले नाही. त्यांच्या शहरांमध्ये लाखोच्या संख्येने लोक राहतात. तिथे सर्व सोयींनियुक्त असे मैदानही आहे. परंतु अजूनही इथल्या मैदानावर प्रत्यक्ष क्रिकेटचा रोमांच अनुभवण्याचा चान्स नागरिकांना मिळाला नाही. तसेच मैदानही या संधी पासून वंचितच आहे. ती कोणती मैदाने आहेत हे आपण आज या लेखाद्वारे जाणून घेऊ.
१) नागपूर : महाराष्ट्राच्या विदर्भातील नागपूर हा जिल्हा आहे. जर नव्याने विदर्भ राज्य स्थापन झाले तर त्याची राजधानी म्हणजे नागपूरच असेल इतक्या क्षमतेचे नागपूर आहे.इथे भले मोठे आकाराने असलेले क्रिकेटचे मैदान देखील आहे. ते सर्व सोयीनी युक्त सुद्धा आहे. आणि या ठिकाणी टेस्ट आणि वनडे या प्रकारच्या क्रिकेट मालिका सुद्धा झाल्या आहे. मात्र अद्याप आयपीएलचा थरार या मैदानाने अनुभवला नाही.फ्लड लाईट ही या मैदानाची विवषता होती मात्र आता मैदानाच्या मॅनेजमेंट टीमने ही उणीव भरून काढत हे मैदान पूर्णपणे सुसज्ज केलेले आहे. लवकरच इथे आयपीएलची मॅच खेळल्या जाईल.
२) हैदराबादचे मैदान सुद्धा आकाराने मोठे असून सर्व सोयींनियुक्त असे आहे. पण या ठिकाणी अजूनही मॅच खेळल्या गेल्याचे कधीही आढळले नाही. जवळपास 25 हजार दर्शक, प्रेक्षक इथल्या स्टेडियम मध्ये बसून सामन्याचे साक्षीदार होऊ शकतात इतका मोठा विस्तार या स्टेडियमचा आहे. मात्र तरीही अद्याप प्रत्यक्ष ही गोष्ट घडली नाही. एकही मॅच या मैदानावर आजपर्यंत खेळल्या गेलेली नाही. याच शहरात दुसरे एक मोठे स्टेडियम आहे त्यामुळे त्याच्या तुलनेत याला संधी दिल्या गेली नाही.
३) जवाहरलाल नेहरू स्टेडियम गोवा : भारत स्वतंत्र झाल्याच्या नऊ दहा वर्षानंतर गोवा राज्य आपल्या भारतात सामील करण्यात आले. पूर्वी तिथे पोर्तुगीज राजवट होती. परंतु स्वतंत्र भारतात आल्यानंतर गोव्याचा हळूहळू विकास होत गेला. आणि आज गोवा प्रगत राज्यांच्या यादीमध्ये आहे. गोव्यातही चांगले स्टेडियम असून ते जवाहरलाल नेहरू स्टेडियम या नावाने ओळखले जाते. हे स्टेडियम जरी सुसज्ज आणि सर्व सोयींनियुक्त असे असले तरी अद्याप इथे एकही सामना खेळण्यात आलेला नाही.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..