आयपीएलच्या प्रत्येक हंगामात घडणाऱ्या ‘या’ 3 गोष्टी आयपीएल 2018 मध्ये मात्र घडल्या नव्हत्या..प्रेक्षकांसह संपूर्ण संघाचे खेळाडू आणि बीसीसीआय सुद्धा झाले होते हैराण..
आयपीएल 2023 आता जवळपास महिनाभरावर आले आहे. त्यामुळे चाहते आतापासूनच आयपीएलच्या मागच्या हंगामातील गोष्टीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेले विक्रम, झालेले सामने, कुणी किती वेळा ऑरेंज केप जिंकली? कुणी किती वेळा पर्पल केप जिंकली? या सर्व प्रश्नांची उत्तरे सध्या नेटवर शोधली जात आहेत.
मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की आजवरच्या आयपीएल इतिहासात जवळपास सर्वच हंगामात 3 गोष्टी नक्की घडतात मात्र एक वर्ष असेही आहे ज्यावर्षी या तिन्हीपैकी एकहो गोष्ट आयपीएलच्या संपूर्ण हंगामात घडली नव्हती.
नक्की कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि कोणत्या वर्षीच्या हंगामात त्यांपैकी एकही गोष्ट घडली नव्हती. जाणून घेऊया या खास लेखाच्या माध्यमातून..
तर मित्रानो आयपीएल सुरु झाले तसे दरवर्षी ह्या ३ गोष्टी प्रत्येक हंगामात घडतात. मात्र आयपीएल 2018 मध्ये तीन गोष्टी दिसल्या नाहीत. या तीन गोष्टी जवळपास प्रत्येक आयपीएलमध्ये पाहायला मिळतात, पण या तीन गोष्टी 2018 च्या हंगामात आयपीएलमध्ये दिसल्या नाहीत.
या ३ गोष्टी आयपीएल 2018 च्या हंगामात घडल्या नाही.
२०१८ च्या आयपीएल दरम्यान कोणत्याही सामन्यात कोणत्याही गोलंदाजाने हॅट्ट्रिक केलेली नाही, ना पावसामुळे एकही सामना रद्द झाला, ना या आयपीएलमध्ये एकही सामना टाय झाला.
प्रत्येक आयपीएलमध्ये या तीनपैकी एक किंवा दुसरी घटना पाहायला मिळते, पण 2018 च्या संपूर्ण हंगामात प्रेक्षकांना यापैकी एकही आयपीएलमध्ये पाहायला न मिळाल्याने तमाम क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले होते.
मात्र, असे असतानाही क्रिकेटप्रेमींना ही आयपीएल खूप आवडली असून तमाम क्रिकेटप्रेमींनी या आयपीएलचे भरभरून कौतुक केले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी या आयपीएलचा मनमुराद आनंद लुटला होता
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..