Cricket News

टीम इंडियाचे ‘हे’ 3 क्रिकेटर नेहमीच व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जास्त खातात , एकाने तर स्वतः मीडियासमोर केलंय मान्य …

टीम इंडियाचे ‘हे’ 3 क्रिकेटर नेहमीच व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जास्त खातात , एकाने तर स्वतः मीडियासमोर केलंय मान्य …


भारतीय क्रिकेटर: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी, फिटनेस हा खेळापेक्षा अधिक महत्वाचा आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी संघाचा भाग होण्यासाठी सर्व खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त  राहण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. खेळाडू स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध आहार योजना (Diet) फॉलो करतात आणि व्यायामाचीही विशेष काळजी घेतात.

सध्या टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना शाकाहारी आहार योजना (Diet) फॉलो करायला आवडते, तर काही खेळाडू असे आहेत ज्यांचा शाकाहारी खाण्याशी काहीही संबंध नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त मांसाहार आवडतो. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी त्यांनी मासाहार केला नाही. या खेळाडूंनी स्वतः आपल्या मुलाखतीत आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून याची पृष्टी केली आहे.

हे भारतीय क्रिकेटपटू आहेत पक्के नॉनव्हेज प्रेमी..

युझवेंद्र चहल (yuzvendra Chahal)

टीम इंडिया

या यादीत पहिले नाव आहे अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलचे(yuzvendra Chahal) , युझवेंद्र चहलचे फिटनेस पाहून तुम्ही म्हणाल की तो,त्याच्या आहाराबाबत जागरूक नाही पण असं अजिबात नाही, युझवेंद्र चहल आपल्या आहाराबाबत खूप जागरूक आहे आणि त्याच्या आहारात मांसाहाराचा समावेश आवश्यक आहे. एका टीव्ही मुलाखतीदरम्यान युझवेंद्रने(yuzvendra Chahal) खुलासा केला होता की, त्याला दिल्लीतील चांदनी चौकात मिळणारे विविध प्रकारचे कबाब, चिकन टिक्का आणि बटर चिकन खायला आवडते.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र चहलने आता मांसाहार सोडला आहे, परंतु अद्याप त्याच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

टीम इंडिया
INDIAN CRICKETER WHO LOVE ONVEG FOOD

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

सध्या T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) आवडता पदार्थ म्हणजे मुंबईचा प्रसिद्ध ‘वडापाव’. सूर्याला रोज सकाळी नाश्त्यात वडापाव खायला आवडतो. त्यानंतर त्याला दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मांसाहाराची आवड आहे. सूर्य कुमारचे आवडते मांसाहारी पदार्थ म्हणजे चिकन जे त्याला भातासोबत खायला आवडते. याशिवाय सूर्याला ऑम्लेट खायलाही आवडते.

महेंद्रसिंग धोनी(MahendraSingh Dhoni)

शारिरीक तंदुरुस्तीच्या बाबतीत, युवा खेळाडूंना दूर सोडणाऱ्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी (MahendraSingh Dhoni) चिकन खाल्ल्याशिवाय कोणताही दिवस जात नाही. वयाच्या ४२ व्या वर्षी फिटनेस सिद्ध करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने नॉनव्हेज खाण्याच्या शर्यतीत हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) मागे टाकले आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी ((MahendraSingh Dhoni) आणि हार्दिक पांड्या(Hardik Pandya)  यांच्यात चिकन खाण्याची स्पर्धा सुरू असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि महेंद्रसिंग धोनीने हार्दिक पांड्याला सहज पराभूत केले होते.

 

तर मित्रांनो हे होते टीम इंडियाचे 3 खेळाडू ज्यांना व्हेज जेवणापेक्षा नॉनव्हेज जेवण जास्त आवडते. एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी त्यांनी नॉनव्हेज जेवण घेतले नाही.. अशीच रंजक माहिती वाचण्यासाठी आमच्या पेजला फोलो करायला विसरू नका..


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button