टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

By | September 16, 2023

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..


 

अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या खेळाच्या जीवावर संपूर्ण क्रिकेटविश्वामध्ये ओळख निर्माण केली. मात्र काही असेही खेळाडू आहेत ज्यांना संघातील इतर स्टार खेळाडूंमुळे त्यांची क्षमता दाखवण्याची वाजवी संधी मिळाली नाही. असे खेळाडू राष्ट्रीय संघाचा भाग होते परंतु मोठ्या नावांच्या उपस्थितीमुळे  त्यांना संघात कधी जास्त संधीच मिळाली नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच 4 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना प्रतिभा असून सुद्धा त्यांच्या संघाकडून खेळण्याची जास्त संधीच मिळाली नाही.

 

सुब्रमण्यम बद्रीनाथ: कधी काळी भारतीय संघाकडून खेळणारा खेळाडू ‘सुब्रमण्यम बद्रीनाथ’ हा या यादीमध्ये सर्वांत वरती आहे.  त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या आहेत परंतु भारतीय संघात सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या उपस्थितीने त्याच्यासाठी एकही जागा रिक्त ठेवली नाही. त्याने थोड्या काळासाठी टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले परंतु संघातील मोठ्या स्टार्समुळे तो पुढे जाऊ शकला नाही. उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत नऊ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत, परंतु त्या धावा सुद्धा त्याला भारतीय संघात दीर्घकाळ स्थान मिळवून देऊ शकल्या नाही. कारण त्यावेळी भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा होता, ज्यांच्या तुलनेत बद्रीनाथने प्रदर्शन कमीच लेखले गेले. आणि निवडकर्त्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.. बद्रीनाथमध्ये एवढ टेलेंट होत की, तो जर आताच्या काळात संघात आला असता तर नक्कीच त्याने आपल्या खेळाने लोकांच्या मनावर राज्य केले असते.

 

ब्रॅड हॉज: ब्रॅड हॉज हा एक उत्कृष्ट ऑस्ट्रेलियन फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे .जो त्याच्या स्मार्ट क्रिकेट प्रतिभेसाठी ओळखला जातो. तो सर्व फॉरमॅटमध्ये यशस्वी झाला आहे परंतु तो सर्वात दुर्दैवी आणि सर्वांत कमी कारकीर्द असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे. संघात पाँटिंग, मार्टिन, हेडन आणि क्लार्क यांच्या उपस्थितीमुळे त्याला जास्त संधी मिळाली नाही. त्याने 25 एकदिवसीय, 15 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 6 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले परंतु ही संख्या त्याची खरी प्रतिभा दाखवण्यासाठी पुरेशी नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सतरा हजारांहून अधिक धावा करणाऱ्या व्यक्तीला अधिक संधी द्यायला हवी होती.

 

 

स्टुअर्ट मॅकगिल:

या यादीमध्ये तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रोलीयाचा फिरकीपटू ‘स्टुअर्ट मॅकगिल’.माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू आपली कारकीर्द सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून संपुष्टात आणू शकला असता परंतु संघातील शेन वॉर्नच्या उपस्थितीने मॅकगिल हा नेहमीच दुसरा पसंतीचा फिरकी गोलंदाज असल्याचे सुनिश्चित केले. मॅकगिलने ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या 44 कसोटी सामन्यांमध्ये 208 बळी घेतले आहेत, जे कोणत्याही गोलंदाजासाठी चांगली आकडेवारी आहे परंतु दुर्दैवाने शेन वॉर्नच्या उपस्थितीमुळे त्याला ऑस्ट्रोलीया संघात तेव्हाच संधी मिळत असे जेव्हा वार्न उपस्थित नसे..

 

मुरली कार्तिक: अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग भारतीय संघासाठी त्यांच्या कामगिरीची गणना करत असताना मुरली कार्तिकने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रदार्पण केले. यामुळे कार्तिकला जास्त संधी मिळणार नाही, हे आधीच निच्छित होते. त्याला सर्वोत्कृष्ट डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक म्हणून रेट केले गेले परंतु तो केवळ 37 एकदिवसीय, 8 कसोटी आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला. 26.70 च्या सरासरीने 644 प्रथम श्रेणी विकेट्ससह, तो कुठेही खेळला असला तरीही तो फलंदाजासाठी धोका होता. मात्र संघात जागाच न मिळाल्यामुळे त्याची कारकीर्द कधी बहरलीच नाही.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *