रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून या 4 स्टार खेळाडूंना मिळत नाहीये संघात जागा, एकदाही मिळत नाहीये खेळण्याची संधी..!
रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून या 4 स्टार खेळाडूंना मिळत नाहीये संघात जागा, एकदाही मिळत नाहीये खेळण्याची संधी..!
रोहित शर्मा आपल्या भारतीय संघातला एक दिग्गज खेळाडू म्हणून आपण सर्वांनी त्यांना मान्यता दिली आहे. रोहित एक केवळ चांगला ओपनरच नसून तो एक किंगफिशर सुद्धा आहे. महेंद्रसिंग धोनी एवढा नसला तरी तो कॅप्टन कुलच वाटतो. त्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ अधिकाधिक प्रगती करतो आहे.
मागच्या वर्षी २०२१ ची आयसीसी विश्वचषक स्पर्धा खेळाडू विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने खेळली. आणि याच दरम्यान धडाकेबाज विराट कोहलीने असे सुतोवाच केले होते की या विश्वचषक स्पर्धेनंतर तो आपले कर्णधार पद सोडून देईल आणि त्यानुसार मग त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी प्रकारांमधून आपली कप्तानशिप सोडली. मग बीसीसीआयने कर्णधार पदाची धुरा शांत स्वभावाच्या रोहित शर्माच्या खांद्यावर टाकली. तेव्हापासून रोहित शर्मा भारतीय संघाचा कॅप्टन आहे.
रोहित ने आशिया चषक स्पर्धा गाजवली. त्याआधी तो आयपीएल मधल्या मुंबई इंडियन्स टीमचा कॅप्टन म्हणून काम करत होता. तो एकदम नवीनच होता असे नव्हे; मुंबईचा कॅप्टन असल्याकारणाने त्याला कर्णधारपदाची सुत्रे चांगली माहीत होती आणि तो अनुभव त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा कामाला आला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत प्रगतीपथावर आहे.

मात्र निरीक्षकांच्या निरीक्षणातून काही गोष्टी निघाल्या. त्यांनी असे सांगितले की जेव्हापासून रोहित शर्मा कॅप्टन झाला तेव्हापासून या चार खेळाडूंची सुट्टी त्यानी केली. आता त्यानी सुट्टी केली की ती आपोआप झाली याबाबत मात्र अनेक तर्कवितर्क आहे. पण हे चार खेळाडू हळूहळू भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हन मधून बाहेर फेकले गेले हे मात्र नक्की. ते खेळाडू कोणते आहे हे आता आपण बघू..
वरूण चक्रवर्ती : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसी चमक दाखवू शकला नाही मात्र याच्याकडे असे कौशल्य होते की क्रिकेट विश्वात नक्कीच एक मोठा तारा म्हणून हा प्रेक्षकांच्या समोर आला असता. मात्र याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त खेळायला मिळालीच नाही. वरूण केवळ पाच सहा मॅचेस मध्ये खेळू शकला ५.८१ च्या इकॉनॉमिने रण देत यानी सहा विकेट घेतल्या.
View this post on Instagram
मोहम्मद शमी : उजव्या हाताने बॉलिंग करणारा जलद गतीचा बॉलर म्हणजे मोहम्मद शमी. मोहम्मद शमीकडे अनेक क्षमता आहे आणि त्याने अनेक वेळा असे सिद्ध सुद्धा केले आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्व करण्याच्या दिवसापासून मोहम्मद शमीचे भारतीय संघातले स्थान हळूहळू कमी होत गेल्याचे निरीक्षकांनी नोंदले आहे. हल्ली सुरू असणाऱ्या विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये सुद्धा संघाच्या प्लेयिंग इलेव्हन मध्ये मोहम्मद शमीचे स्थान नाही. जसप्रीत बुमराह जखमी झाल्यानंतर त्याला स्थान देण्यात आले .
राहुल चाहर: भारताचा ऑफस्पिनर राहुल चाहर चे स्थान हल्ली यजुवेंद्रने घेतले असून तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून किती खेळेल याबाबत शंका उपस्थित झाल्या आहे. राहुल आतापर्यंत पाच मॅचेस मध्ये खेळला असून ९.१५ च्या इकोनोमिने रन देऊन एकूण आतापर्यंत सहा विकेट्स घेतल्या आहे. त्यामुळे कदाचित असे होऊ शकते की राहुल पेक्षा अधिक ताकतीच्या आणि अधिक क्षमतेच्या खेळाडूला रोहित शर्माच्या नेतृत्वात संधी मिळाली असेल.
View this post on Instagram
शार्दुल ठाकूर : आतापर्यंत २५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेला शार्दुल ठाकूर यानी ७.९७ रनाच्या इकोनोमिने रन्स देवून २९ विकेट प्राप्त केल्या. याचेही स्थान रोहीतच्या नेतृत्वामध्ये मागे राहिले. त्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही निवड अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि समर्थन असूनदेखील शार्दुल रोहितच्या मनात अजून स्थान प्राप्त करू शकला नाही. त्यामुळे हळूहळू त्याला संधी कमी प्रमाणात मिळाली आणि म्हणून कदाचित तो प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना दिसत नाही.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..