न्यूझीलंडविरुद्ध या 4 भारतीय खेळाडूंनी ठोकलेत सर्वांत जास्त शतके, एक खेळाडू आहे भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार..
युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ नुकताच न्यूझीलंड दौरा संपवून मायदेशी परतला. आहे. या दौऱ्यात भारताने न्यूझीलंड सोबत ३ ट्वेंटी आणि ३ एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळली. ट्वेंटी सिरीज भारताने सहज नावावर केली मात्र एकदिवशीय मालिकेत भारतीय संघाला मालिका गमवावी लागली.
View this post on Instagram
याच मालिकेत भारतीय संघाकडून एक दोन खेळाडूंनी शतक ठोकले. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की आतापर्यंत भारतीय संघाकडून खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूंनी न्यूझीलंडमध्ये सर्वांत जास्त शतके ठोकलीत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या ५ खेळाडूंविषयी सांगणार आहोत ज्यांनी भारतीय संघाकडून खेळतांना न्यूझीलंड मध्ये एकदिवशीय सामन्यात सर्वांत जास्त षटकार ठोकलेत.
१)वीरेंद्र सेहवाग: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.
वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्ध 6 वनडे शतके झळकावली आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके करणारा तो पहिला खेळाडू आहे. सेहवागने किवी संघाविरुद्ध 23 डावात 52.59 च्या सरासरीने 1157 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर: सेहवाग नंतर दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे क्रिकेटचा देव ‘सचिन तेंडुलकर’. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध 5 वनडे शतके झळकावली आहेत. त्याने किवी संघाविरुद्ध 41 डावात 46.05 च्या सरासरीने 1750 धावा केल्या आहेत.
सौरव गांगुली: या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू आणी कर्णधार ‘सौरव गांगुली. गांगुलीने न्यूझीलंडमध्ये तब्बल 5 शतके ठोकली आहेत. यातील ३ शतके ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ठोकली आहे.
View this post on Instagram
विराट कोहली: गांगुली पाठोपाठ विराट कोहलीनेही किवी संघाविरुद्ध ५ शतके झळकावली आहेत. कोहलीच्या 26 डावात 59.91 च्या सरासरीने 1378 धावा आहेत. विराटने आपल्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने किवी गोलंदाजांची धुलाई करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अत्यंत कमी दिवसात ५ शतके ठोकणारा विराट पहिला खेळाडू आहे. ५ शतके ठोकण्यासाठी विराटला केवळ 15सामने लागले होते.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..