भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात या 5 खेळाडूंच्या प्रदर्शनाने जिंकली चाहत्यांची मने, ह खेळाडू नसते खेळले तर भारत झाला असता पराभूत..
ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेली विश्वचषक स्पर्धा सर्वांनाच माहित आहे. अनेकांनी या स्पर्धेचा थरार देखील अनुभवला आहे. साऱ्या जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागलेले आहे. या स्पर्धेमध्ये भारत दुसर्या गटात असून भारताने या गटामध्ये गुणतालिकेने सर्वात पहिले स्थान प्राप्त केले आहे.
अलीकडे झालेली पाकिस्तान सोबतची मॅच सर्वच भारतीयांना रोमांच आणी थरारक अनुभव देवून गेली. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला मॅचचा हा थरार अनेकांना नेहमीसाठी अविस्मरणीय आहे. त्यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला धूळ चारली. पण या अपयशामधून सावरून भारतीय संघाने बांगलादेश वर मात करत पुन्हा एकदा आपली ताकद वाढवून गुणतालिकेत सर्वोच्च स्थान प्राप्त केले.

ही मॅच सुद्धा भारतीय संघासाठी अजिबात सोपी नव्हती. मुळातच उथळ असलेली धावपट्टी आणि त्यावर पावसाचे आलेले सावट अशा सर्व वातावरणात भारतीय संघाला बांगलादेशच्या संघाचा सामना करावा लागणार होता. या मॅचदरम्यान तर आपले काही खेळाडू प्लेईंग ईलेवनमधल्या खेळाडूंचे मातीने भरलेले बूट स्वच्छ करताना देखील दिसून आले. तर प्रत्यक्ष मैदानावर खेळणारे खेळाडू सातत्याने बॉल कोरडा करताना दिसत होते. मैदानावर पाण्याचे वातावरण असल्यामुळे भारतीय संघाला ही मॅच जिंकणे काही सोपे नव्हते. मात्र, हे पाच खेळाडू या मॅचचे खरे योद्धे ठरले. तर ते कोणते खेळाडू आहे ते आपण पाहू.
१) के.एल.राहुल : मागच्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये जात असलेला खेळाडू के.एल.राहुल या सामन्यात मात्र आपली चमक दाखवू शकला. अवघ्या ३२ चेंडूमध्ये ५० रनाचे अर्धशतक त्यानी ठोकले. आणि भारतीय संघ १८४ स्कोअरबोर्ड तयार करू शकला. यामध्ये राहुलचे मोठे योगदान आहे. त्याच्या या धावांमध्ये चार षटकार आणि तीन चौकाराचा समावेश आहे.
View this post on Instagram
२) विराट कोहली : पाकिस्तानला मात करत विराटने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की तोच जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. बांगलादेश विरूद्ध सुद्धा विराटने आपली चमक दाखवली. ६४ रणाची धडाकेबाज नाबाद पारी खेळत विराटने मोठा स्कोरबोर्ड बांगलादेशच्या संघासमोर उभा केला. जो पाहिल्याबरोबर बांगलादेशी संघाचा आत्मविश्वास आधीच दुबळा झाला. विराटने एक षटकार आणि आठ चौकार ठोकले आणि विशेष म्हणजे तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.
३) सूर्यकुमार यादव : भारताचा सूर्या अर्थातच सूर्यकुमार यादव यानी देखील आपल्या नेहमीच्या धडाकेबाज धुवाधार स्टाईलने १६ चेंडू ३२ रन ठोकले आणि आपले चांगले योगदान दिले.
४) अर्शदीप सिंग : ‘पाजी तुसी ग्रेट हो’ म्हणून चाहत्यांनी ज्याची भरभरून प्रशंसा केली असा अर्शदीप सिंग यानी आपल्या बॉलिंगने प्रतिस्पर्धी संघाचे छक्के सोडवले. अर्शदीपने आपल्या ४ ओव्हर मध्ये ३८ रन देऊन २ महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. या विकेट त्याने अशा स्थितीत मिळवल्या जेव्हा बांगलादेशी संघ तडफदार गतीने धावा काढत होता. त्यामुळे अर्शदीपचे सगळ्यांनी कौतुक केले.
View this post on Instagram
५) हार्दिक पांड्या : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याने आपले नाव कमावले आहेच. पण या पूर्ण टूर्नामेंट मध्ये जरी हार्दिक ने आपल्या बॅटमधून काही कमाल दाखवला नसला तरी या मॅच मध्ये मात्र त्यानी मिळवलेल्या विकेट्समुळे बांगलादेशी फलंदाजांवर भारतीय संघाने खूप मोठा दबाव बनवला. आणि याचे सर्व श्रेय हार्दिक पांड्याच्या खात्यात जमा होते.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..