World Cup 2023: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणता संघ कधी बाजी मारेल याचा काही नेम नसतो. जो संघ ज्या दिवशी चांगला खेळतो त्या दिवशी विजयी नक्कीच होतो. विश्वचषक स्पर्धेत देखील अनेकदा काही लिंबू-टिंबू संघांनी बलाढ्य असलेल्या संघांना गुडघे टेकवायला भाग पाडले आहे. विश्वचषकात नुकतेच झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला हरवले तर कालच्या सामन्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकवायला भाग पाडले. विश्वचषक स्पर्धेत कोणत्या बलाढ्य संघांना लिंबू-टिंबू संघाकडून पराभूत व्हावे लागले आहे, याची माहिती घेऊयात.
World Cup 2023: हे संघ झालेत आयत्या वेळेला लहान संघाकडून पराभूत
गतवेळाचा चॅम्पियन इंग्लंडच्या संघाला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाच वेळा अपसेटचा शिकार व्हावे लागले आहे. बांगलादेश, झिंबाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघाने त्यांचा पराभव केला आहे. विश्वचषकात दुबळ्या संघाकडून सर्वाधिक वेळा पराभव होणारा इंग्लंडचा एकमेव संघ आहे. यंदाच्या विश्वचषकात त्यांना अफगाणिस्ताना नमवले आहे. अफगाणिस्तानने केलेला हा पराभव त्यांच्या चांगला जिवारी लागलेला आहे.
ऐन मोक्याच्या क्षणी महत्वाचे सामने गमावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स का म्हटले जाते याचे उत्तर कालच्या सामन्यात मिळाले. नेहमीच दिग्गज खेळाडू घेऊन विश्वचषकात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत चार वेळा दुबळ्या संघाने पराभव केला आहे. यात बांगलादेश आणि नेदरलँडच्या संघाने दोन वेळा त्यांना पराभवाचे पाणी पाजले आहे. हा संघ एकदाही विश्वचषक जिंकू शकला नाही.
दोन वेळचा चॅम्पियन राहिलेल्या वेस्टइंडीज संघाला तीन वेळा लिंबू टिंबू संघाने पराभूत केले आहे. केनिया, आयर्लंड आणि बांगलादेश या संघाने त्यांचा पराभव करत क्रिकेट जगतात एकच खळबळ माजवली होती. 1992 साली झालेल्या विश्वचषकानंतर या संघाने नावाला लौकिक अशी कामगिरी कधीच केली नाही.
भारतीय संघाला देखील दोन वेळा अपसेट व्हावे लागले होते. 1999 मध्ये झिंबाब्वेच्या संघाला हलक्यात घेणे टीम इंडियाला भारी पडले होते. 2007 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेश संघाने दारुण पराभव करत संघाला स्पर्धेबाहेर काढले होते.
पाकिस्तानचा संघ देखील विश्वचषकात दोन वेळा अपसेट झालेला पाहायला मिळतोय. पाकिस्तानच्या संघाला आर्यलंड आणि बांगलादेश संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केल्यानंतर हे दोन्ही संघ क्रिकेट जगतामध्ये अचानक प्रकाश झोतात आले होते.
विश्वचषकात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला देखील लिंबू टिंबू असलेल्या झिंबाब्वेच्या नवख्या संघाने एकदा पराभूत केले होते.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी