क्रिकेटमध्ये अधिराज्य निर्माण करणाऱ्या या 5 भारतीय दिग्गज खेळाडूंना खेळता आले नाही 100 आयपीएलचे सामने!

खेळाडू: कसोटी क्रिकेट असो अथवा वनडे क्रिकेट प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूंनी जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भारतीय क्रिकेटचे नाव जगाच्या नकाशात झळकवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. नव्वदीच्या दशकामध्ये ज्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट गाजवले त्या खेळाडूंना आयपीएल मध्ये जास्त काळ खेळता आले नाही. याचे कारण म्हणजे या खेळाडूंचे वाढते वय. या खेळाडूंच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यांमध्ये आयपीएलला सुरुवात झाल्याने त्यांना जास्त सामने खेळता आले नाही. पाच असे भारतीय दिग्गज खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये शंभर सामने देखील खेळता आले नाही. कोण आहेत ते दिग्गज खेळाडू जाणून घेऊयात. 

या 5 दिग्गज खेळाडूना खेळता आले नाही आयपीएलमध्ये 100 सामने..!

1.सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 200 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत तर 463 वनडे सामन्यात त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या इतके वनडे आणि कसोटी सामने इतर कोणत्याही खेळाडूला खेळता आले नाहीत. पण सचिन तेंडुलकरला 100 देखील आयपीएलचे सामने खेळता आले नाहीत. त्याने मुंबई इंडियन्स कडून केवळ 78 सामने खेळला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन संघाचा मेंटोर म्हणून काम पाहतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

2. व्हीव्हीएस लक्ष्मण

‘संकटमोचक’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा स्टायलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याला आयपीएल मध्ये अवघे 20 सामने खेळता आले. 2008 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाचा तो कर्णधार म्हणून खेळला होता.एक उत्तम कसोटीपटू असलेल्या या खेळाडूला T20 क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आली नाही. निवृत्तीनंतर त्याने सनरायझर्स हैदराबाद या संघाचा मेंटोर म्हणून काम पाहिले.

3.राहुल द्रविड

‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेले भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 89 आयपीएलचे सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून त्याने सुरुवातीला आयपीएल मधून सुरुवात केली. 2008-10 मध्ये बंगळूर संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते राजस्थान रॉयल्स संघामध्ये दाखल झाले. या आयकॉनिक प्लेअरला 2011 मध्ये राजस्थान रॉयल्स ने आपल्या संघात दाखल करून घेतले. कर्णधार पदाची धुरा त्यांच्याकडे दिली. मात्र तिथेही त्यांची कामगिरी जेमतेम राहिली. त्यानंतर त्यांच्याकडे मेंटोर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

4.अनिल कुंबळे

भारताचे स्टार फिरकीपटू अनिल कुंबळे यांना आयपीएलमध्ये केवळ 42 सामने खेळता आले. 2008 – 2010 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ते काही काळ मुंबई इंडियन्स संघाचे मेंटॉर म्हणून काम पाहिले होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जादुई फिरकी गोलंदाजीने भल्या भल्या दिग्गज फलंदाजाची भंबेरी उडवणाऱ्या या गोलंदाजाला आयपीएलचे विजेतेपद पटकावून देता आले नाही.

क्रिकेटमध्ये अधिराज्य निर्माण करणाऱ्या या 5 भारतीय दिग्गज खेळाडूंना खेळता आले नाही 100 आयपीएलचे सामने!

5.आशिष नेहरा

डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मध्यम गती वेगवान गोलंदाज आशिष नेहरा ययांना केवळ 88 आयपीएलचे सामने खेळले आहेत. 2008 ते 17 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तो दुखापतीमुळे अनेक सामने खेळू शकला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने गुजरात टायटन या संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा त्याने यशस्वीरीत्या सांभाळली. 2022 आयपीएलचे विजेतेपद गुजरातला पटकावून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top