आयपीएल 2023 संपताच ‘हे’ 5 दिग्गज खेळाडू होऊ शकतात आयपीएलमधून निवृत्त, एकाचे तर आहे करोडो चाहते..
इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल ही एक अशी लीग आहे ज्याची प्रतिवर्षी करोडो क्रिकेट प्रेमी तसेच खेळाडू प्रतीक्षा करतात. आयपीएल हे एक असे व्यासपीठ आहे जिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेले खेळाडूही त्यांची प्रतिभा दाखवताना दिसतात आणि त्यांचे चाहतेही त्यांना पाहून आनंद घेतात.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामानंतर एक ना एक खेळाडू निवृत्त होतो. आयपीएल 2023 च्या समाप्तीसह जगातील या सर्वात मोठ्या लीगमधून निवृत्तीची घोषणा करू शकणारे 5 भारतीय खेळाडू कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया.
View this post on Instagram
अंबाती रायुडू: 37 वर्षीय अंबाती रायडूच्या कारकिर्दीतील हे शेवटचे आयपीएल असू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रायुडूची आयपीएल कारकीर्द शानदार आहे. रायडूने मुंबई आणि चेन्नईकडून खेळतानाही विजेतेपद पटकावले आहेत. गेल्या मोसमात चेन्नईसाठी 13 सामन्यात 274 धावा करणाऱ्या रायुडूने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 188 सामने खेळले असून, 29.10 च्या सरासरीने आणि 127.12 च्या स्ट्राइक रेटने 4190 धावा केल्या आहेत. रायुडूने या काळात 1 शतक आणि 22 अर्धशतके झळकावली आहेत. पुढील आयपीएलपर्यंत रायुडूचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असेल, त्यामुळे कदाचित तो यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्त होईल.
इशांत शर्मा : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला आयपीएलमध्ये अनेक हंगाम नियमितपणे खेळण्याची संधी मिळत नाही. सध्या, IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या इशांतला 2020 मध्ये 1, 2021 मध्ये 3 तर 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. जर शर्माला आयपीएल 2023 मध्येही दिल्ली कॅपिटल्सकडून संधी मिळाली नाही तर तो या लीगमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. शर्माने आपल्या कारकिर्दीत 93 आयपीएल सामने खेळले असून 73 विकेट्स घेतल्या आहेत. तो कोलकाता, हैदराबाद आणि पंजाबकडूनही खेळला आहे.
View this post on Instagram
वृद्धिमान साहा: यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाचा हा शेवटचा आयपीएल हंगाम देखील असू शकतो. सध्या गुजरात टायटन्सचा भाग असलेला साहा 2023 मध्ये 39 वर्षांचा होत आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आयपीएल सुरू होईल तेव्हा तो 40 च्या जवळपास असेल, त्यामुळे या हंगामाच्या समाप्तीनंतर तो आयपीएलला बाय बाय म्हणू शकतो. साहाने आतापर्यंत झालेल्या सर्व आयपीएल खेळल्या आहेत. कोलकाता, पंजाब, हैदराबाद, चेन्नईकडून खेळलेल्या साहाने 144 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 11 अर्धशतके झळकावत 24.27 धावा केल्या आहेत.
दिनेश कार्तिक: आयपीएल 2023 हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा सीझन देखील ठरू शकतो, ज्याने गेल्या मोसमात आपल्या फलंदाजीने चमक दाखवली. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता, मुंबई, पंजाब, गुजरात आणि दिल्लीकडून खेळला आहे. गेल्या मोसमात 183.33 च्या सर्वोच्च स्ट्राइक रेटने धावा करणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलच्या 229 सामन्यांमध्ये 20 अर्धशतके ठोकून 4376 धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनी: इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला चार वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याचे खेळाडू म्हणून ही शेवटची आयपीएल असू शकते. 2023 मध्ये 42 वर्षांचा होणारा धोनी पुढील हंगामात खेळाडू म्हणून दिसण्याची शक्यता कमी आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या धोनीने 2008 पासून 234 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 39.20 च्या सरासरीने आणि 135.20 च्या स्ट्राइक रेटने 4978 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 24 फिफ्टी नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा: