आयपीएलमध्ये आतापर्यंत या 5 फलंदाजांनी ठोकलेत सर्वांत जास्त अर्धशतके, एकाने तर पहिल्याच हन्गामात्त ठोकले होते तब्बल एवढी अर्धशतक..
जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग आयपीएलमध्ये भारतातील आणि परदेशातील अनेक खेळाडू सहभागी होतात .सध्याच्या घडीला सर्वांत लोकप्रिय टी-२० लीग म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच अनेक स्फोटक फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशा धुलाई करत धावांचा डोंगर उभारला. त्यात अनेक खेळाडूंनी जबरदस्त असे अर्धशतके ठोकली. काही खेळाडूंनी अवघ्या 20/25 चेंडूमध्ये सुद्धा दमदार फलंदाजी करून अर्धशतक साजरे केली आहेत.
परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की आजपर्यंत या आयपीएल स्पर्धेमध्ये सर्वांत जास्त अर्धशतके कुणी मारले आहेत? नाही ना? तर आज या विशेष लेखात आम्ही तुम्हाला आयपीएल इतिहासातील त्या पाच खेळाडूंची नावे देखील सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावली आहेत. चला तर मग सुरु करूया आजच्या या विशेष लेखाला..
१.डेव्हिड वॉर्नर: स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 114 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून एकूण 36 अर्धशतके झळकली आहेत.ही कोणत्याही खेळाडूंनी ठोकलेली आयपीएलमधील सर्वांत जास्त वैयक्तिक अर्धशतके आहेत.
View this post on Instagram
२.गौतम गंभीर: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत गौतम गंभीर दुसऱ्या स्थानावर आहे. गौतमने आतापर्यंत आयपीएलचे 148 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये गौतम गंभीरने 35 अर्धशतके झळकावली आहेत.

३.रोहित शर्मा: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माने त्याच्या आयपीएल इतिहासातील 159 सामन्यांमध्ये आतापर्यंत 32 अर्धशतके झळकावली आहेत.
४.सुरेश रैना:आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये सुरेश रैना चौथ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 161 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सुरेश रैनाने एकूण 31 अर्धशतके झळकावली आहेत.
View this post on Instagram
५.विराट कोहली:आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये सुरेश रैना चौथ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 149 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये सुरेश रैनाने एकूण 30 अर्धशतके झळकावली आहेत.
तर मित्रानो हे होते ते ५ स्फोटक फलंदाज ज्यांनी आयपीएल मध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त अर्धशतके ठोकली आहेत. यांच्यातील सर्वांत जास्त आवडता खेळाडू कोणता कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दल ताज्या घडामोडी व रंजक माहिती वाचण्यासाठी आमच्या पेजला फोलो करायला विसरू नका..
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..