किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू पॉल वल्ताटी याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना 2011 साली 120 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात लक्ष्यचा पाठलाग करत असताना केलेली ही सर्वात मोठी खेळी ठरली. या खेळीला 14 वर्षे होऊन पूर्ण झाले. मात्र अद्यापही हा विक्रम अबाधित आहे. या खेळीनंतरही त्याला आयपीएलमध्ये जास्त संधी भेटली नाही. तो सध्या काय करतोय याविषयी कोणाला काहीही कल्पना नाही.
चला तर आज या फिचरमध्ये आयपीएल मध्ये लक्ष्याचा पाठलाग करतांना कोणत्या खेळाडूंनी किती मोठी धावसंख्या केलीय याकडे एक नजर टाकूया…
२.वीरेंद्र सेहवाग
View this post on Instagram
धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने 2011 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळताना डेक्कन चार्जेस विरुद्ध 119 धावांची खेळी केली होती. लक्ष्यचा पाठलाग करत असताना केलेली ही सर्वात मोठी दुसरी खेळी ठरली. वीरेंद्र सेहवागचा हा विक्रम पॉल याने त्याच वर्षी सर्वप्रथम मोडीत काढला. सेहवाग आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
३. संजू सॅमसन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांनी 2021 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळताना 119 धावांची मोठी खेळी केली होती. लक्ष्यचा पाठलाग करत असताना केलेली ही सर्वात मोठी तिसरी खेळी ठरली. संजू हा राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार असून यंदाच्या हंगामात त्याचा संघ पूर्णतः फार्मात आहे. या संघाने सुरुवातीचे तीन सामने जिंकून गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
४.शेन वॉटसन
चेन्नई सुपर किंग्स अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने 2018 मध्ये हैदराबाद विरुद्ध खेळताना 117 धावांची नाबाद विजयी शतकी खेळी केली होती. शेन वॉटसन आता निवृत्त झाला असून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कोचिंग स्टाफ मध्ये काम करतोय. शेन वॉटसन याचे आंतरराष्ट्रीय कारकीर्द जबरदस्त राहिली तरी ते जास्त वेळ राहिले नाही. दुखापतीमुळे त्याला निवृत्त व्हावे लागले. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड शेन वॉटसन याला संघाचा प्रशिक्षक करू इच्छित आहे मात्र शेन वॉटसन ने पीसीबीची ही ऑफर ठोकरली.
५.सनथ जयसूर्या
श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्या यांनी 2008 मध्ये सीएसके विरुद्ध खेळताना नाबाद 114 धावांची शतकी खेळी केली होती. त्यावेळी तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात त्यांनी हा कारनामा केला होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सनथ जयसूर्या राजकारणात सक्रिय झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मनोरे रचणाऱ्या या खेळाडूला आयपीएल मध्येही जबरदस्त कामगिरी केली.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.