आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या 5 खेळाडूंनी जिंकलेत सर्वांत जास्त ‘सामनावीर’ पुरस्कार, एकाने तर तब्बल एवढ्या वेळा कोरलंय पुरस्कारावर नाव..

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या 5 खेळाडूंनी जिंकलेत सर्वांत जास्त सामनावीर पुरस्कार, एकाने तर तब्बल एवढ्या वेळा कोरलंय पुरस्कारावर नाव..
आयपीएल 2023 सुरु होण्यासाठी अवघे काही महिने उरले आहेत. दरम्यान, क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये आगामी मोसमाचे सूर वाजत आहेत, तसेच जुने रेकॉर्ड आणि आगामी हंगामाचीही जोरदार चर्चा आहे. कोणीतरी आयपीएल 2023 च्या विजेत्या संघाचा अंदाज बांधताना दिसत आहे, तर कुठेतरी ऑरेंज-पर्पल कॅप कोण जिंकणार याची चर्चा होतेय..
पण तुम्हाला माहीत आहे का की कोणत्या खेळाडूने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे? चला तर मग आम्ही तुम्हाला या लेखात आम्ही तुम्हाला टॉप-5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक जास्त सामनावीर पुरस्कार पटकावलेत.
आयपीएल इतिहासातील सर्वांत जास्त सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू..
१_एबी डिव्हिलियर्स: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामनावीराचे विजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंचा विचार केला तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे माजी स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स या यादीत अव्वल स्थानावर आहेत. होय, डिव्हिलियर्सने आतापर्यंत 23 वेळा सामनावीराचा किताब पटकावला आहे.

2-ख्रिस गेल: या यादीत दुसरे नाव आहे युनिव्हर्सल बॉस म्हणजेच ख्रिस गेल. सध्या पंजाब किंग्जचा भाग असलेल्या गेलने 22 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला असून तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
3- रोहित शर्मा: आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, रोहित शर्माने 18 सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत आणि तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. यासह रोहित हा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारतीय खेळाडू आहे.
4-डेव्हिड वॉर्नर: सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांनीही आयपीएलमध्ये आतापर्यंत 17-17 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे आणि दोघेही या यादीत चौथ्या स्थानी आहेत.
5- शेन वॉटसन: या यादीत पाचव्या क्रमांकावर शेन वॉटसन आणि युसूफ पठाण हे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी 16-16 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. हे दोन्ही खेळाडू आता आयपीएलचा भाग नाहीत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…