भारतीय संघात खेळण्याच्या लायक नव्हते ‘हे’ 5 भारतीय खेळाडू, तरीही सेटिंग लावून मिळवली जागा मात्र झाले अपयशी..

भारतीय संघात खेळण्याच्या लायक नव्हते 'हे' 5 भारतीय खेळाडू, तरीही सेटिंग लावून मिळवली जागा मात्र झाले अपयशी..

खेळाडू: जगभर कक्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये भारतीय संघाचा सुद्धा सहभाग आहे. भारतात आतापर्यंत असे अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले ज्यांनी आपल्या खेळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाय देशात अनेक दिग्गज खेळाडू उदयास आले आहेत, पण असे काही खेळाडू आहेत जे भारतासाठी खेळण्यासाठी योग्य नव्हते, परंतु काही सामन्यांमध्ये कामगिरी करून त्यांनी टीम इंडियात स्थान निर्माण केले.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे टीम इंडियामध्ये खेळण्यास पात्र नव्हते, असे आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला संपूर्ण लेख वाचून आणि त्यांची आकडेवारी पाहून कळेलच..  हे खेळाडू फक्त काही सामने खेळून आपल्या नावासमोर माजी भारतीय खेळाडू लावण्यात यशस्वी झाले. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहता तर असच वाटत. चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहेत खेळाडू.

हे 5 खेळाडू भारतीय संघामध्ये खेळण्याच्या लायक नव्हते.

भारतीय संघात खेळण्याच्या लायक नव्हते 'हे' 5 भारतीय खेळाडू, तरीही सेटिंग लावून मिळवली जागा मात्र झाले अपयशी..

व्हीआरव्ही सिंग : या यादीमध्ये पहिले नाव आहे ते म्हणजे भारतीय संघाचा माजी खेळाडू व्हीआरव्ही सिंग. फलंदाजी अष्टपैलू म्हणून व्हीआरव्ही सिंगला 2006 मध्ये भारतीय संघात संधी मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता. पण तरीही वेगवान गोलंदाज अष्टपैलू असल्याने त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली. ज्याचा त्याला फायदा घेता आला नाही. व्हीआरव्ही सिंगने भारतीय संघासाठी ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 11.75 च्या सरासरीने बॅटने केवळ 47 धावा केल्या. त्यांची संपूर्ण क्रिकेट कारकीर्द पाहून असचं वाटत की, यांना संघात संधी मिळायला नको होती.

 

  मनप्रीत गोनी:  चेन्नई सुपर किंग्जच्या कोट्यातून भारतीय संघात प्रवेश मिळवणारा आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणजे  मनप्रीत गोनी . त्यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या जवळ असल्यामुळे गोनी भारतीय संघात खेळताना दिसत होता. पण, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी कधीही प्रभावी ठरली नाही.

मनप्रीत गोनीने भारतीय संघासाठी 2 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 38 च्या सरासरीने 2 बळी घेतले. तसेच गोनीने आयपीएलच्या 44 सामन्यांत केवळ 37 विकेट घेतल्या होत्या. अलीकडेच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, चेंडूसह त्याने 53.38 च्या सरासरीने केवळ 8 विकेट्स घेतल्या.

त्याने 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही विकेट घेतली नाही आणि बॅटने 8 च्या सरासरीने फक्त 8 धावा केल्या. विक्रम सिंगही आयपीएलमध्ये बॅट आणि बॉल या दोन्हीत कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्यांची कारकीर्द खूपच लहान राहिली. मनप्रीतची आकडेवारी पाहता तो घरेलू क्रिकेटमध्येही खेळण्याच्या लायक नव्हता, तरीही त्याला भारतीय संघात संधी दिली गेली मात्र, तो त्याचा फायदा उचलू शकला नाही.

भारतीय संघात खेळण्याच्या लायक नव्हते 'हे' 5 भारतीय खेळाडू, तरीही सेटिंग लावून मिळवली जागा मात्र झाले अपयशी..

 सुदीप त्यागी:   वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीलाही 2009 मध्ये भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली नाही त्यानंतरही त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. ज्याला चुकीचा निर्णय म्हणता येईल. सुदीपने भारतीय संघासाठी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने फक्त 3 विकेट घेतल्या.

त्यागीने 1 टी-20 सामनाही खेळला, पण तो अजिबात प्रभावी ठरला नाही. त्यागी 2009-10 मध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. दोन्ही संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. त्यामुळे त्याला खेळण्याच्या संधी मिळत  राहिल्या, पण तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही.

एम.एस.के. प्रसाद: भारतीय संघाच्या निवडकर्त्यांपैकी एक मन्नवा प्रसाद भारतीय संघाकडूनही खेळला आहे. पण, त्याची कामगिरी पाहिली तर तो अजिबात प्रभावी नव्हता. खराब कामगिरीनंतरही त्याला संघात संधी मिळत राहिली. त्याचे एक कारण म्हणजे त्याचे यष्टिरक्षक फलंदाज असणे.

एमएसके प्रसादने 6 कसोटी सामन्यात 106 धावा केल्या आणि 17 एकदिवसीय सामन्यात फक्त 131 धावा केल्या. ज्यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून तो भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ताही होता. जो खेळाडू संघात खेळण्यास योग्य नव्हता तो मुख्य निवडकर्ता झाला. त्यामुळे बीसीसीआयला खूप ट्रोल करण्यात आले होते.

गुरकिरत सिंग मान:  2019 मध्ये गुरकीरत सिंग मानला फिरकी अष्टपैलू म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले होते. रवींद्र जडेजाचा पर्याय म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आला. पण, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही, त्यानंतर त्याला संघात संधी मिळाली नाही.गुरकीरत सिंह मान ने लिया संन्यास, IPL में पंजाब, दिल्ली, आरसीबी की ओर से  खेले - gurkirat singh mann retired played for punjab delhi rcb in ipl-mobile

गुरकीरत सिंग मानने भारताकडून 3 एकदिवसीय सामने खेळताना केवळ 13 धावा केल्या आणि फक्त एक विकेट घेतली. मानची आयपीएलमधील कारकीर्दही फार मोठी नव्हती. पण, तरीही संघ त्याला काही काळ संधी देत ​​असल्याचे दिसत आहे.

तर मित्रांनो, हे होते ते 5 माजी भारतीय खेळाडू ज्यांना भारतीय संघात संधी मिळूनही फार अशी काही कामगिरी करू शकले नाही. यांची आकडेवारी पाहता, त्यांना संघात संधी दिली नसती तरीही काही फरक पडला नसता असे म्हटले तर वावग ठरणार नाही..


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *