Cricket News

IND vs AFG 2nd T-20: दुसऱ्या टी-२० मध्ये होणार विराट कोहलीची इंट्री, ‘या’ युवा खेळाडूला व्हावे लागणार संघातून बाहेर..!

IND vs AFG 2nd T-20:  भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. जो टीम इंडियाने 6 विकेट्सने जिंकला होता. या विजयासह टीम इंडियाने मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली आहे. या टी-२० मालिकेसाठी विराट कोहलीचाही संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानंतर विराट दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यानंतर कोणता खेळाडू संघाबाहेर राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

IND vs AFG : विराटच्या पुनरागमनाने तिलक वर्माची होणार संघातून हकालपट्टी..

पहिल्या T20 सामन्यात डावखुरा फलंदाज तिलक वर्माचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. पहिल्या सामन्यात

तिलक वर्माची कामगिरी काही विशेष नव्हती. त्याला फलंदाजीत चांगली सुरुवात झाली पण तिलक वर्माला ही लय शेवटपर्यंत राखता आली नाही. पहिल्या T20 सामन्यात तिलक वर्माने 22 चेंडूत 26 धावा केल्या. आपल्या खेळीदरम्यान तिलक वर्माने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.

आता तिलक वर्मा ला दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते, असे वृत्त समोर येत आहे. दुसरीकडे, विराट कोहली दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करेल, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माला संघात बदल करावा लागणार आहे. विराटच्या येण्याने तिलकची संघातील जागा धोक्यात येणार हे जवळपास निच्छित आहे.

IND vs AFG 2nd T-20: दुसऱ्या टी-२० मध्ये होणार विराट कोहलीची इंट्री, 'या' युवा खेळाडूला व्हावे लागणार संघातून बाहेर..!

IND vs AFG :पहिला सामना ६ गडी राखून जिंकला.

भारतीय संघाने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद नबीने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी २-२ बळी घेतले. टीम इंडियाने 159 धावांचे लक्ष्य 17.3 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाकडून शिवम दुबेने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली.


हेही वाचा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button