क्रीडा

केन विल्यमसन ते निकोलस पूरन.. या 5 दिग्गज खेळाडूंना आयपीएल संघाने काढले टीममधून बाहेर, लिलावात मिळू शकेल मोठी बोली?

केन विल्यमसन ते निकोलस पूरन.. या 5 दिग्गज खेळाडूंना आयपीएल संघाने काढले टीममधून बाहेर, लिलावात मिळू शकेल मोठी बोली?


आयपीएल 2023 साठी कायम केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सर्वच फ्रेन्चायझीने बीसीसीआयकडेकाळ सुपूर्द केली आहे. यात काही स्टार खेळाडू सुद्धा आहेत ज्यांना त्यांच्या संघांनी आयपीएल 2023 साठी कायम ठेवलेनाहीये. काही खेळाडूंची नावे वाचून आच्छर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

गतविजेत्या गुजरात टायटन्सने आगामी आयपीएल हंगामासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि अफगाणचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाज यांना कोलकाता नाईट रायडर्सकडे विकले आहे. टायटन्सने या वर्षाच्या सुरुवातीला आयपीएल मेगा लिलावात फर्ग्युसनला १० कोटी रुपयांना विकत घेतले. किवी संघासाठी 13 सामने खेळले आणि 12 बळी घेतले ज्यात चार विकेट्सचा समावेश होता.

यादरम्यान त्यांचा इकॉनॉमी रेट ८.९६ होता. या वेगवान गोलंदाजाने यापूर्वी 2017 ते 2021 पर्यंत दोन वेळा चॅम्पियन केकेआरचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्रँचायझीसह पुन्हा एकत्र आले. त्याचवेळी, ESPNcricinfo च्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला सोडले आहे. फ्रँचायझीने उजव्या हाताचा फलंदाज रॉयला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 2 कोटींना विकत घेतले.

मात्र, रॉय यांनी बायो बबलचा हवाला देत नाव मागे घेतले.रॉयने आतापर्यंत 13 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 129.02 च्या स्ट्राइक रेटने 329 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतके झळकली आहेत.त्याची सुटका देखील निश्चित मानली जात होती कारण तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि या कारणास्तव इंग्लंडने देखील त्याची टी20 विश्वचषक 2022 च्या संघात निवड केली नाही.

हैदराबादने सोडली विल्यमसनची साथ..

Revsportz च्या रिपोर्टनुसार हैदराबादने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कॅप्टन केन विल्यमसन आणि निकोलस पूरन यांना सोडले आहे. फ्रँचायझीला त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विल्यमसनबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने निराश केले आहे. हैदराबादने किवी खेळाडूला तब्बल 14 कोटी रुपये देऊन कायम ठेवले.

उजव्या हाताच्या फलंदाजाने आयपीएल 2022 मध्ये 13 सामने खेळले आणि 93.51 च्या खराब स्ट्राइक रेटने केवळ 216 धावा केल्या. यादरम्यान त्याने अर्धशतकही झळकावले आहे.वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनला हैदराबाद फ्रँचायझीने तब्बल 10.75 कोटी रुपयांना सामील करून घेतले.पुरणने आयपीएल 2022 मध्ये 14 सामने खेळले आणि 144.34 च्या स्ट्राइक रेटने 306 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली.

देवदत्त पडिक्कल राजस्थान रॉयल्सच्या खेम्यात..

आयपीएल

आयपीएल 2022 च्या उपविजेत्या राजस्थान रॉयल्सने रसी व्हॅन डर डुसेन आणि डॅरिल मिशेल यांना सोडले आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.त्याचबरोबर त्याने भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलला कायम ठेवले आहे. दुसानने आयपीएल 2022 मध्ये 3 सामने खेळले ज्यात तो केवळ 12 धावा करू शकला. दुसरीकडे, किवी फलंदाज मिचेलबद्दल बोलायचे तर, त्याने 2 सामने खेळले आणि त्याला केवळ 17 धावा करता आल्या.

खब्बू फलंदाज पडिक्कलबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएल 2022 मध्ये 17 सामन्यांमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करताना 122.88 च्या स्ट्राइक रेटने 376 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून अर्धशतक झळकले आहे.


हेही वाचा:

या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत…

न्यूझीलंड पोहोचताच रस्त्यावर फिरायला लागले भारतीय खेळाडू, यजुवेन्द्र चहलने शेअर केलेले फोटो होताहेत व्हायरल..

या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button