ICCWT20WOLRDCUP2023: या 5 कारणामुळे भारतीय महिला संघाला सेमीफायनल सामन्यात पाहावे लागले पराभवाचे तोंड, विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले..
आयीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी संध्याकाळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. हा सामना खूपच रोमांचक झाला आणि शेवटी ऑस्ट्रेलियाने 5 धावांच्या अल्पशा फरकाने जिंकला.
त्यामुळे भारताचे वर्ल्डकप फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. भारताच्या या पराभवात ऑस्ट्रेलियन संघाच्या अष्टपैलू कामगिरीने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे भारतीय संघानेही अशा काही चुका केल्या ज्यामुळेसंघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. या चुकांचा विचार करून प्रत्येक खेळाडूला वाईट वाटेल,यात दुमत नाही. चला तर जाणून घेऊया नक्की भारतीय महिला संघाकडून कोणत्या चुका झाल्या होत्या.
१.ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचे झेल.
भारतीय महिला संघाली महागात पडलेली पहिली चूक म्हणजे ऑस्ट्रोलीयाचे सलामीवीर फलंदाज मेग लॅनिंग चा झेल सोडणे. सलामीवीर बेथ मुनीने कर्णधार मेग लॅनिंगसह ऑस्ट्रेलियाला १७२ धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. मूनीने अर्धशतक झळकावत 54 धावा केल्या, तर मेग लॅनिंगने नाबाद 49 धावा केल्या. भारताला या दोन्ही फलंदाजांना लवकर बाद करण्याची संधी होती पण संघाने दोघांनाही जीवदान दिले . बेथ मुनीला दहाव्या षटकात शेफाली वर्माने बाद करता आले असते मात्र तिने सोपा असा झेल सोडून मुनीला जीवदान दिले. तर मेग लॅनिंगचा झेल रिचा घोषने 1 धावावर असतानाच सोडला.त्यानंतर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवली.

२.खराब गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
भारतीय संघाच्या या पराभवात गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. संघाच्या सर्व गोलंदाजांना योग्य लांबीची गोलंदाजी करता आली नाही आणि त्यांनी अनेक धावा गमावल्या. संघाची आघाडीची गोलंदाज दीप्ती शर्मा सतत शॉर्ट पिच चेंडू टाकत होती, जे ऑस्ट्रेलियन संघाला खेळणे खूप सोपे होते. त्याच वेळी, सामन्यातील क्षेत्ररक्षण देखील कोणत्याही विशेष पद्धतीने आयोजित केले गेले नाही, ज्यामुळे कर्णधार हरमनप्रीतवर बरीच टीका झाली.
३.सलामीवीर जोडी पुन्हा ठरली अयशस्वी ..
या स्पर्धेतील भारतीय संघाची सर्वात मोठी अडचण ही टॉप ऑर्डरची आहे. या सामन्यातही सलामीवीर शेफाली वर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरली, तर मागील सामन्याची हिरो असलेली स्मृती मानधनाही सहज बाद झाली, त्यामुळे संघाला अडचणीचा सामना करावा लागला आणि पहिल्यापासूनच संघावर दबाव दिसू लागला, मधल्या काही षटकात कर्णधार हरमनप्रीत कौरने दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा ऑस्ट्रोलीयाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.
४.हरमनप्रीत कौर झाली धावबाद..!
भारतीय संघ एकेकाळी हा सामना सहज जिंकतो की काय असं वाटत होता. त्याला कारण होत ते म्हणजे कर्णधार हरमनप्रीत कौर करत असलेली फलंदाजी. अत्यंत दबावाच्या स्थितीत फलंदाजीस आलेल्या कौरने काऊटर अटेक करत ऑस्ट्रोलीया गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर दुर्देवीरित्या धावबाद झाली आणि संघाचीअडचण चांगलीच वाढली. जर कौर आणखी 2/3 षटके जरी फलंदाजी करू शकली असती तर भारतीय संघ हा सामना सहज जिंकू शकला असता. म्हणूनच कर्णधाराचा विकेट ही संघाच्या पराभवाचे मोठे कारण बनली..
This run out in the semi-finals reminded one of #Dhoni's match…..💔#AUSvIND #INDWvsAUSW #WorldCup #HarmanpreetKaur #MSDhoni #CricketTwitter pic.twitter.com/ep4Re0xtNT
— ANOOP KUMAR (@ANOOPKU23830656) February 24, 2023
५.ऋचा घोषने क्रिएटिव्ह शॉट खेळण्यासाठी डॉट बॉल खेळले.
भारतीय संघाची स्टार खेळाडू ‘ऋचा घोष’ हिच्यासाठी ही स्पर्धा स्वप्नापेक्षा कमी नव्हती. मात्र, त्याचा शेवट वाईट झाला. जेव्हा ती मैदानात उतरली तेव्हा चेंडू आणि लक्ष्य यात फारसा फरक नव्हता आणि जरी तिने सरळ शॉट्स आरामात खेळले असते तरी चालले असते पण ऋचाला क्रिएटिव्ह शॉट्स खेळायचे होते, त्यामुळे अनेक चेंडू खराब झाले आणि हेही महागात पडले. रचनात्मक फटके खेळण्याएवजी तिने जर एकेरी-दुहेरी धावफलक चालवला असता तरीही शेवटपर्यंत संघ सामना जिंकू शकला असता.
तर मित्रांनो ह्या होत्या काही चुका ज्यामुळे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रोलीया समोर गुढगे टेकावे लागले आणि संघाचा वर्ल्डकप प्रवास सेमीफायनल पर्यंत जाऊन थांबला. असो, खेळ म्हटल की हार जीत चालू असतेच. पुढच्या वेळेस पुन्हा नव्याने सुरवात करून वर्ल्डकप जिंकू अशी अपेक्षा बाळगू..
हेही वाचा:
व्हिडीओ प्लेलीस्ट: