हे आहेत World Cup 2023 मध्ये खेळणारे 5 सर्वांत श्रीमंत खेळाडू, यादीमध्ये केवळ 2 भारतीय खेळाडूंचा समावेश..
आज आम्ही तुम्हाला या खास लेखामध्ये विश्वचषक 2023 (World cup 2023) मध्ये खेळणाऱ्या ऐकून खेळाडूमधील सर्वांत श्रीमंत खेळाडू ( richest cricketers in worldcup) कोण आहे याबद्दल माहिती देणार आहोत. या लेखामध्ये आपण या विश्वचषकमध्ये खेळणाऱ्या अश्या 5 खेळाडूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे सर्वांत श्रीमंत खेळाडू आहेत. यांची संपत्ती करोडोच्या घरामध्ये आहे. चला तर मग सुरवात करूया आजच्या या लेखाला.
विश्वचषक २०२३ मध्ये खेळणारे 5 सर्वांत श्रीमंत खेळाडू (5 richest cricketers who play in Odi World Cup 2023)

1.विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा यादीमध्ये सर्वांत वर आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) खेळणारा सर्वात श्रीमंत खेळाडू विराट कोहली आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीची संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सचिन तेंडूलकरनंतर विराट हा क्रिकेट क्षेत्रातील दुसरा सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे. सचिन या विश्वचषकामधे खेळणार नसल्यामुळे विराट हा या वर्ल्डकपमधील सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे.
View this post on Instagram
2.पॅट कमिन्स (Pat Cummins)
आता येऊया दुसऱ्या खेळाडूवर. विराट कोहलीनंतर यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World cup 2023 )खेळणारा दुसरा सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ‘पॅट कमिन्स’ (Pat Cummins). पॅट कमिन्सची अंदाजे संपत्ती 350 कोटींहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. ऑस्ट्रोलिया संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे आल्यापासून तो चांगल्या फोर्ममध्ये परतला असून त्याच्या कामगिरीमध्येतर सुधारला झालीच शिवाय जसे जसे दिवस जात गेले तसे त्याची संपत्तीसुद्धा वाढत गेलीय.

3.रोहित शर्मा (Rohit Sharma)
विराट,पॅट कमिन्स नंतर या यादीमध्ये तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे भारतीय संघाचा स्टार कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्म (Rohit Sharma). होय, भारतीय कर्णधार रोहित शर्मा या यादिमध्ये आहे. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा 210 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचा मालक आहे. रोहितची कमाई विराटच्या तुलनेत खूप कमी असली तरी प्रसिद्धीच्या बाबतीत मात्र कर्णधार रोहित शर्मा हा विराट पेक्षा कमी नाहीये. मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून आणि नंतर भारतीय संघाची कमान सांभाळल्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. रोहित हा सध्या भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध खेळाडू आहे.

4. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)
रोहित, विराट, कमिन्स नंतर या यादीमध्ये सर्वांत श्रीमंत असा चौथा खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रोलियाचा दिग्गज खेळाडू (स्टीव्ह स्मिथ (Steve Smith). स्मिथ हा जवळपास गेली 10 वर्ष ऑस्ट्रोलिया संघासाठी अंतरराष्ट्रीय सामने खेळतोय. याशिवाय त्याच्या उत्पनाचा आणखी एक मोठा सोर्स म्हणजे जाहिरात. ऑस्ट्रोलिया मध्ये जाहिरातीसाठी सर्वांत पहिली पसंती असणारा क्रिकेटर कोण असेल तर तो स्मिथ आहे. ऑस्ट्रोलीयन मिडिया नुसार, स्टीव्ह स्मिथची(Steve Smith). संपत्ती 200 कोटींहून अधिक आहे.
View this post on Instagram
5. मिचेल स्टार्क (Mitchell starc)
आता बोलूया या यादीतील सर्वांत शेवटच्या खेळाडूबद्दल जो विश्वचषक 2023 खेळणाऱ्या संघातील सर्व खेळाडूमधील 5 वा श्रीमंत खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell starc) हा या यादीतील शेवटचा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे. त्याच्या ऐकून संपतीचा सोर्स हा क्रिकेट असून जाहिरातीतून तो क्वचितच पैसे कमावतो.
मिचेल स्टार्क (Mitchell starc) ऑस्ट्रोलियासाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट तर खेळतोच शिवाय आयपीएल, टी-२०, टी-10 यांसारख्या इतर देशांतील स्पर्धेत सुद्धा खेळतो ज्यामुळे त्याच्या कमाईमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

तर मित्रांनो, हे होते ते 5 खेळाडू जे विश्वचषक 2023 मध्ये खेळणारे 5सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे. तसे पाहण्यास गेले तर, या यादीमध्ये सर्वांत श्रीमंत असलेले ५ खेळाडू हे 2 देशातीलच आहेत. ऑस्ट्रोलिया आणि भारत याच देशातील हे 5 खेळाडू सध्या सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे.
FAQ
१.जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेटर कोण आहे? (Who is richest Cricketer in world?)
जगभरात अनेक क्रिकेटपटू आतापर्यंत क्रिकेट खेळत आले असून प्रत्येकाने आपपल्या परीने संपती कमवाली आहे. मात्र जर क्रिकेटमधील आजवरचा सर्वांत शश्रीमंत क्रिकेटपटू कुणी असेल तर तो आहे भारतीय संघाचा मास्तर ब्लास्टर सचिन तेंदुलकर (Sachin Tendulkar). सचिन तेंडूलकरची ऐकून संपत्ती (Sachin Tendulkar Net Worth) ही 1500 करोड रु पेक्षा जास्त आहे.
२.विराट कोहलीची एकून संपत्ती किती आहे? (Virat Kohli’s net worth)
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची ऐकून संपत्ती ही 1050 कोटी रुपये आहे. जगभरात सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूपैकी विराट हा सर्वांत श्रीमंत खेळाडू आहे. विराटच्या संपतीमध्ये प्रत्येक वर्षी अंदाजे 100 कोटी रुपयाची वाढ होत आहे. क्रिकेट शिवाय विराटच्या संपत्तीचा मुख्य स्त्रोत हा जाहिरात आहे. विराट जाहिरातीमधून क्रिकेट पेक्षा जास्त कमावतो. तो प्युमा (Puma),MRF Tyres, Manyavar,Wrogn,Colgate,Too Yumm,Myntra, Uber. यांसारख्या मोठ्या कंपनीचा Brand Ambassador आहे.
3. क्रिकेटर रोहित शर्माची ऐकून कमाई किती आहे? (Rohit sharma’s net worth)
भारतीय संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्माची ऐकून संपत्ती ही 210 कोटी रु एवढी आहे. भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून रोहितच्या कमाईमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तो बीसीसीआयसोबत लिस्ट A मध्ये करार केलेला खेळाडू आहे. ज्याला वार्षिक 11 कोटी पगार मिळतो. रोहितच्या संपत्त्तीमध्ये आयपीएल, जाहिरात यांसारख्या सोर्सचा हिस्सा आहे. शिवाय रोहीत भारतातील काही कंपन्याचा जसे की, Maggi, Oppo, Nissan, Lays, Glenmark, CEAT, Aristocrat, IIFL Finance, Highlanders, Relispray, Rasna, Dream 11 यांचा Brand Ambaddador आहे
हेही वाचा: