विराट कोहली ते रिकी पॉंटिंग.. ‘या’ 6 खेळाडूंनी संघाला विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून दिलेत, वाचा विराटने किती सामन्यात भारताला विजय मिळवून दिलाय?

0
8

विराट कोहली ते रिकी पॉंटिंग.. ‘या’ 6 खेळाडूंनी संघाला विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून दिलेत, वाचा विराटने किती सामन्यात भारताला विजय मिळवून दिलाय?


विराट कोहली: भारतात सध्या विश्वचषक 2023 खेळवला जात आहे. जगभरातील 10 देशांचे संघ या मोठ्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.वर्ल्डकप सारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये काही खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के योगदान देत असतात. काहीजण फलंदाजीत तर कुणी गोलंदाजीत तर कुणी संघाचे नेतृत्व करून, आपल्यातील कार्यकुशलता दाखवत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. या फिचरमध्ये आज आपण वर्ल्ड कप सामन्यात कोणत्या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये किती सामन्यात सर्वाधिक हातभार लावला आहे ज्याची माहिती घेणार आहोत.

1.रिकी पॉंटिंग (ricky ponting)

उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार ‘रिकी पॉंटिंग’ याने विश्वचषक स्पर्धेतील 38 सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला मदत केली आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने 2003 आणि 2007 मध्ये विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर काही वेळ तो ऑस्ट्रेलिया संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. आता तो स्वतःचा बिझनेस पाहतोय.

विराट कोहली ते रिकी पॉंटिंग.. 'या' 6 खेळाडूंनी संघाला विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवून दिलेत, वाचा विराटने किती सामन्यात भारताला विजय मिळवून दिलाय?

2. ग्लेन मॅकग्राथ ( Glenn McGrath)

जागतिक दर्जाच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने सलो की पळो करून सोडणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ‘ग्लेन मॅकग्राथ’ याने विश्वचषक स्पर्धेत 34 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. ऑस्ट्रोलीयासाठी तो सुद्धा अतिशय महत्वाचा खेळाडू होता.

३. ऍडम गिलख्रिस्ट  (Adam Gilchrist)

या यादीत तिसरा खेळाडू आहे तो म्हणजे ऑस्ट्रोलियाचा दिग्गज खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट  (Adam Gilchrist) . ऑस्ट्रेलियाचा सलामीचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट याने संघाला विजय मिळवून देण्यात 28 सामन्यात बहुमोल असे योगदान दिले. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत त्याने आक्रमक फलंदाजी करून गोलंदाजांवरती एक वेगळा धाक निर्माण केला होता. तो क्रिकेटमधून निवृत्त झाला असून आता ऍडम समालोचकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. 

ADM GLICHRIST

४. मुथया मुरलीधरन  (Muttiah Muralitharan)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू ‘मुथया मुरलीधरन (Muttiah Muralitharan)’ याने संघाला विश्वचषकातील 27 सामन्यात बहारदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर तो टॉप वर आहे. निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाच्या खेळाडूंना गोलंदाजीचे धडे दिले. सध्या तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.

5. सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar)

कसोटी क्रिकेट असो अथवा एकदिवसीय भारताने आतापर्यंत जेवढे काही विजय मिळवले आहेत. त्यात सर्वाधिक योगदान सचिन तेंडुलकरने दिले आहे.मास्टर ब्लास्टर सचिनने विश्वचषक स्पर्धेतील 27 सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिस आणि ब्रँडन मॅक्युलम यांनी अनुक्रमे 25 सामन्यात त्यांच्या संघाला विजय मिळवून देण्यास मदत केली.

विश्वचषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये सचिन तेंडूलकरचाच बोलबाला,पहा यादी.

6. महेला जयवर्धने (Mahela Jayawardene)

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, भारताचा विराट कोहली आणि न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांनी अनुक्रमे 24 सामन्यात आप आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला होता. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीच सध्या क्रिकेटमध्ये खेळत आहे, तर इतर सर्वच खेळाडू हे क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here