दिसायला सुंदर असणाऱ्या या 7 महिला सिरीयल किलरनी साक्षात मृत्यूचे तांडव आणले होते..
दिसायला सुंदर असणाऱ्या या 7 महिला सिरीयल किलरनी साक्षात मृत्यूचे तांडव आणले होते..
आपल्या सर्वांना गुन्हेगारी जगतामध्ये फक्त पुरूष गुन्हेगारच कुख्यात आहेत असं वाटत असेल परंतु आपल्याकडेच नाही तर अमेरिकेत देखील काही महिला गुन्हेगारी क्षेत्रांमध्ये प्रचंड कुख्यात आहेत. या महिलांनी अत्यंत निर्दयपणे अनेकांचा जीव घेतला आणि त्यांच्या याच निर्भयपणाने त्यांना जगातील सर्वात कुख्यात गुन्हेगारी पैकी एक बनवल. तर मग जाणून घेऊयात या महीलांबद्दल…..
एयलीन वाऊर्नोस: या महिलेचा जन्म 1965 मध्ये फ्लोरिडा प्रांतात झाला होता या महिलेने 1989 ते 1990 या एका वर्षाच्या दरम्यान सात जणांचा निर्दयपणे खून केला या सातही जणांना तिने पॉईंट ब्लांक रेंज मध्ये शूट केले. एका लहान रोड एक्सीडेंट दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेतलं ती महिला चालवत असलेले गाडी तिनेच खून केलेल्या पैकी एकाची होती त्यामुळे पोलिसांना चौकशी दरम्यान पुढील सात हत्यांची माहिती सापडली. तिला यातील ६ हत्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली 2003 मध्ये तिच्या आयुष्यावर एक चित्रपट देखील आला होता.

ज्युडी ब्युनानोव: याच महिला गुन्हेगाराला तत्कालीन वृत्तपत्रांनी ब्लॅक वीडो असे नाव दिले होते कारण या महिलेने स्वतःच्या पतीला आणी मुलाला देखील विष देऊन मारून टाकले. तिच्या या गुन्ह्यासाठी तिला मृत्युदंड देण्यात आला 1971 मध्ये या दंडाची कारवाई देखील करण्यात आली फ्लोरिडा मधील मृत्युदंडाची शिक्षा प्राप्त केलेली ती पहिली महिला ठरली त्याच्या मृत्यूनंतर अनेक मर्डर मध्ये तिचा हात असल्याचं पोलिसांना तपासादरम्यान लक्षात आलं.
जौना बरझा: ही महिला मेक्सिको येथील एक व्यवसायिक पहिलवान होते 1957 ला या महिलेचा जन्म झाला तिने जवळपास 42 48 महिलांची हत्या केल्याचे सांगण्यात येते तिच्या या गुन्ह्यासाठी तिला 759 वर्ष कारागृहात काहीच करण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
जेन टप्पन: ही महिला एका इस्पितळांमध्ये नर्स म्हणून काम करत असे तिने जवळपास 31 जणांचा खून केला होता ती इंजेक्शनच्या माध्यमातून विषचा प्रयोग करून या सर्वांची हत्या करत असे.
ती प्रत्येक हत्ये वेळी वेगळ्या प्रकारच्या विषाचा प्रयोग करत असे. तिने 1901 सली 31 हत्यांची जबाबदारी स्वीकारली होती.
गेसचे गोटफ्राइड: ही महिला एक जर्मन सिरीयल किलर होती याच महिला सर्वात शेवटी देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली तिने जवळपास पंधरा लोकांची निर्घुणपणे हत्या केली. ती लोकांच्या अन्नामध्ये विष करून त्यांचा जीव घेत असे. तिने तिच्या आई-वडिलांचा पतीचा देखील खून केलेला होता.
अमेलिया डायर: असे म्हटले जाते की या महिलेला एकाच हत्तेसाठी शिक्षा झाली होती परंतु तिचे नाव मात्र अनेक केसमध्ये घेतले गेले. तिने अनेक लहान बालकांना देखील मारण्यात मागेपुढे बघितले नाही. ती एका अनाथालयात जवळपास वीस वर्ष काम करत होते आणि या दरम्यान तिने जवळपास 400 अनाथ मुलांचा खून केल्याचे सांगण्यात येते तिच्या या हत्येमुळे ती जगातील सर्वात जास्त खतरनाक सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते. 1896 मध्ये एक हत्या करण्याचा प्रयत्नात असतांना तिला अटक करण्यात आली आणि त्यासाठी तिला फाशीची शिक्षा देखील देण्यात आली.
क्रिस्टन गिलबर्ट: ही महिला देखील एका हॉस्पिटलमध्ये नर्स च काम करत असे. तिला चार हत्या साठी दोषी ठरवण्यात आले होते. ती देखील लोकांना विष देऊन मारत असे. 1998 ला तिच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले. तिला टेक्सास मध्ये उमर कैदेची शिक्षा देण्यात आली.
हेही वाचा:
या 5 गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त ‘नो बॉल’ फेकलेत…
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..