शंभराव्या कसोटी सामन्यामध्ये आतापर्यंत ‘हे’ 9 दिग्गज फलंदाज झाले आहेत “गोल्डन डक” चे शिकार, तिघे आहेत भारतीय खेळाडू!

शंभराव्या कसोटी सामन्यामध्ये आतापर्यंत 'हे' 9 दिग्गज फलंदाज झाले आहेत "गोल्डन डक" चे शिकार, तिघे आहेत भारतीय खेळाडू!

IND vs ENG: धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. हा सामना भारताचा फिरकीपटू आर. आश्विन आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो याच्यासाठी यांच्यासाठी खूप खास आहे. कारण दोघेही आपल्या कसोटी कारकीर्दीतला शंभरावा कसोटी सामना खेळत आहेत. गोलंदाजीमध्ये अश्विनने चमकदार कामगिरी करत पहिल्या डावात चार गडी बाद केले. मात्र फलंदाजी तो अपयशी ठरला. फलंदाजीत मात्र तो खाते देखील उघडू शकला नाही हार्टलीच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

कारकीर्दीच्या 100 व्या कसोटीमध्ये हे फलंदाज झालेत शून्यावर बाद..

कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या फिरकी पुढे या फलंदाजांनी घातले लोटांगण; वाचा कोणत्या खेळाडूला किती वेळा केलय बाद!

आर. अश्विन शंभराव्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा जगातला आठवा आणि भारताचा तिसरा खेळाडू बनला आहे. ३७ वर्षीय अश्विनच्या आधी भारतीय दिग्गज दिलीप वेंगसरकरच्या नावावरही हा नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. अश्विन आणि वेंगसरकर यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श, ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्क टेलर, न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग, ब्रेंडन मॅक्युलम आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक शंभराव्या कसोटीत शून्यावर बाद झाले आहेत. अनुभवी चेतेश्वर पुजारालाही आपल्या शंभराव्या कसोटीच्या पहिल्या डावात खाते उघडता आले नाही.

रविचंद्रन अश्विन 100 कसोटी सामने खेळणारा तो भारताचा चौदावा खेळाडू ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर पाच शतकांची नोंद आहे. त्याने यापूर्वी अनेकदा कसोटी सामन्यांमध्ये छोटेखानी ऐतिहासिक खेळी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

तो त्याच्या शंभराव्या कसोटी सामन्यात काहीतरी स्पेशल कामगिरी करेल असे वाटत होते; मात्र पाच चेंडू खेळून तो शून्य धावसंख्येवर माघारी परतला.

2023 मध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने शंभरावा कसोटी सामना खेळला होता ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. शंभराव्या कसोटीत शून्यावर बाद होणारा तो दुसरा खेळाडू आहे. दिलीप वेंकसरकर यांनी 1988 साली न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा शंभरावा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात ते शून्यावर बाद झाले होते. 100 व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. 

शंभराव्या कसोटी सामन्यामध्ये आतापर्यंत 'हे' 9 दिग्गज फलंदाज झाले आहेत "गोल्डन डक" चे शिकार, तिघे आहेत भारतीय खेळाडू!

कसोटी सामन्या विषयी बोलायचं झाले तर, भारत पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत मजबूत स्थितीत आहे. भारताने यापूर्वीच ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली आहे.  पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आपले स्थान कायम राखेल.

2014 मध्ये दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये इंग्लंडने भारताचा 4-1 अशा फरकाने दारुण पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला भारताला घेण्याची आता चालून संधी आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका भारत विराट कोहली विना खेळत आहे. भारताने शेवटच्या कसोटीत विजय मिळवला तर भारतासाठी हा मालिका विजय सर्वात मोठा विजय ठरू शकेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *